शपथविधीसाठी फडणवीसांची तयारी; कोणी तयार केले शपथविधीसाठी खास जॅकेट?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:55 PM2024-12-03T17:55:56+5:302024-12-03T17:59:07+5:30
Nagpur : नागपूरच्या टेलरने शिवले फडणवीसांचे महापौर पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचे कपडे
नागपूर :महाराष्ट्राचामुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना उधाण आले असतांना आणि शपथविधीची तारीख समोर आली असतांना देवेंद्र फडणवीसचमहाराष्ट्राचेमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता शपथविधीसाठी फडणवीसांसाठी खास जॅकेट तयार केले असल्याची माहिती नागपूरच्या त्यांच्या स्थानिक टेलरने दिली आहे.
महाराष्टाचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची शपथविधीसाठीची जय्यत तयारी सुरु असल्याचे समोर येत आहे. फडणवीसांचे नेहमीचे टेलर 'पिंटू महाडिया' यांनी फडणवीसांसाठी चार ड्रेस तयार केले आहेत. पिंटू महाडिया हे फडणवीसांसाठी ते महापौर असल्यापासून कपडे तयार करत आलेले आहेत. फडणवीस पूर्वी काही खास समारंभांनाच जॅकेट परिधान करत असत पण आता त्यांच्या कपड्यांची वेगळी स्टाईल प्रचलित झाली आहे. शपथविधीसाठी फडणवीसांसाठी वेगवेगळ्या रंगांचे जॅकेट मुंबईला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे टेलर महाडिया यांनी तयार केलेले जॅकेट फडणवीस शपथविधीला परिधान करतील याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.
शपथविधी समारंभासाठी चालू असलेली फडणवीसांची तयारी महाराष्ट्रात चालू असलेला कोलाहल शांत करण्यासाठी पुरेशी आहे. नागपूरकरांसाठी ही आनंदाची आणि गौरवाची बाब असणार कि त्यांचे 'देवभाऊ' अखेर मुख्यमंत्री बनणार. सोबतच त्यांच्या देवेंद्र फडणवीसांकडून असलेल्या अपेक्षा सुद्धा वाढल्या. त्यामुळे राजकारणात आणि राज्यात चालू असलेल्या तर्क वितरकांना विराम देत फडणवीसांच्या टेलरने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होत असल्याचे थोडक्यात महाराष्ट्रातील जनतेला कळवले.