फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 11:19 PM2019-10-07T23:19:56+5:302019-10-07T23:21:11+5:30

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली.

Fadnavis will be made Chief Minister again: Resolve in padyatra at Somalwada area | फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प

फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प

Next
ठळक मुद्देभगिनींनी ओवाळली आरती 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली. महापालिकेचे सत्तापक्ष नेते तसेच निवडणूक प्रमुख संदीप जोशी यांच्या नेतृत्वात नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान, स्थानिक भागिनींनी जागोजागी आरती ओवाळून पदयात्रेचे स्वागत केले तसेच मुख्यमंंत्री फडणवीस यांना विजयाचा आशीर्वादही दिला.
पदयात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी ‘मै भी देवेंद्र’ हे घोषवाक्य असलेले टी-शर्ट परिधान केले होते. ज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सोमलवाडा भागातील सावित्री विहारापासून सोमवारी सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर संदीप जोशींसह भाजप कार्यकर्त्यांनी राहुलनगर, कांजी हाऊस चौक, कॉस्मोपॉलिटन, झेंडा चौक, आखाडा चौक, बौद्धविहार परिसरातील नागरिकांना भेटी दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करण्याची जोशी यांनी विनंती केली. घोषणांनी सोमलवाडा परिसरातील वातावरणात भाजपच्या विजयाचा शंख फुंकण्यात आला. फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनविण्यासाठी आपल्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
या पदयात्रेत संदीप जोशी यांच्यासह प्रभागातील नगरसेवक लक्ष्मी यादव, लखन येरवार, वनिता दांडेकर तसेच अनिल सावरकर, भाजपचे ओबीसी महामंत्री चंदू साठवणे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र मुंडले, प्रभागातील महामंत्री, प्रभाग १६ च्या भाजप झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Fadnavis will be made Chief Minister again: Resolve in padyatra at Somalwada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.