Video: गोंडस योग! कऱ्हांडल्यात पाच बछड्यांसह ‘फेअरी’चे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 09:20 PM2021-02-10T21:20:10+5:302021-02-10T21:20:47+5:30
Tiger calves : बुधवारी सकाळी पर्यटकांना ही वाघिण बछड्यांसह दिसल्यावर अनेकांनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. काही तासातच हा व्हिडीओ व्हायरलही झाला.
- संजय रानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसात वाघांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यासाठी पुढचे दिवस उज्ज्वल दिसत आहेत. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेल्या या अभयारण्यात अलीकडे पर्यटकांना दररोज व्याघ्रदर्शन घडत आहे.
अगदी अलीकडे तर ‘फेअरी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या टी-३ या वाघिणीने आपल्या पाच बछड्यांसह पर्यटकांना मुक्तपणे दर्शन दिले आहे. यामुळे पर्यटकांची पावले पुन्हा या अभयारण्याकडे वळायला लागणार आहेत. वन्यजीव अभ्यासकांच्या मते एखादी वाघीण साधारणत: तीन ते चार बछड्यांना जन्म देते. पाच किंवा त्यापेक्षा अधिक बछडे देण्याची घटना शंभरात एखादीच घडते.
बुधवारी सकाळी पर्यटकांना ही वाघिण बछड्यांसह दिसल्यावर अनेकांनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. काही तासातच हा व्हिडीओ व्हायरलही झाला. बुधवारी सकाळी गोठणगाव प्रवेशद्वारातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना अगदी सकाळी पिवळ्या व काळ्या पट्ट्यांचे पाच नवे पाहुणे आपल्या आईसोबत फिरताना दिसले. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक आणि मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांंनी यासंदर्भात ‘लोकमत’कडे पुष्टी दिली.
मागील काही दिवसात वाघांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यासाठी पुढचे दिवस उज्ज्वल दिसत आहेत. #SaveTigerspic.twitter.com/whIQ46YntJ
— Lokmat (@MiLOKMAT) February 10, 2021