बनावट चेचिस क्रमांकाचे ट्रक रस्त्यावर

By admin | Published: January 8, 2015 01:19 AM2015-01-08T01:19:16+5:302015-01-08T01:19:16+5:30

बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे.

Fake Chechnya number truck on the road | बनावट चेचिस क्रमांकाचे ट्रक रस्त्यावर

बनावट चेचिस क्रमांकाचे ट्रक रस्त्यावर

Next

वर्धा आरटीओची कारवाई : एकाच क्रमांकाचे तीन ट्रक चालविणारे रॅकेट असल्याचा संशय
वर्धा : बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री आरटीओच्या फिर्यादीवरुन एका ट्रक मालकाविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा आरटीओकडे गुरुविंदर सिंग ऊर्फ गुल्लू ढिल्लन रा. नागपूर यांच्या सीजी ०४ जी ६३७४ या ट्रकबाबत तक्रार प्राप्त झाली. वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षकांना हे वाहन वर्धा हद्दीत आढळताच ते ताब्यात घेतले. शंका येताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय माजरीकर यांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. सदर वाहनाचा मूळ चेचिस नंबर घासून खोडलेला असून त्यावर नवीन बनावट अंकित केलेला आढळला, पार्ट नंबरही खोडलेला आहे. मात्र मोटार वाहन तपशिलावर ४२६०३१ केयुझेड १८४१२१ असा क्रमांक आढळून आला. याचा चेचिस टाकलेल्या क्रमांकाशी कुठेही ताळमेळ नाही. हा प्रकार साधासुधा नसून असे रॅकेट सक्रिय असावे, असा संशय पक्का झाला. ही कारवाई सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, मोटार वाहन निरीक्षक डी. झेड. राठोड, अश्फाक अहमद, वेणूगोपाल शेंडे, मोहन बोरडे, अनंद मेश्राम, संजय पाटील यांनी केली. या आधारे सदर वाहन मालकाविरुद्ध सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सदर ट्रक मालकाविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलीस आरोपी अटक करण्यासाठी रवाना झाले, मात्र अटक झाली नसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
फायनान्स कंपन्यांनाही लाखोंचा गंडा
तीन ट्रक विविध नावाने फायनांसवर खरेदी करायचे. मात्र एका ट्रकची आरटीओकडे नोंद केली जात असल्यामुळे एका ट्रकचे फायनान्स संबंधित कंपन्या वसुल करुन घेतात. मात्र इतर दोन ट्रकची नोंदच नसल्यामुळे ते ट्रक कुठे आहे याचा शोधच लागत नसल्यामुळे फायनान्स कंपन्यांनाही याची मोठी झळ पोहचत असल्याचीही माहिती सूत्राने दिली.
ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन
सदर ट्रकच्या माध्यमातून तीनपट जादा मालाची वाहतुक करण्यात येत असल्याची प्रकरणे यापूर्वी आरटीओ आणि पोलिसांच्या कारवाईत उघड झाल्याचे आरटीओ विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाईमुळे सदर रॅकेटचे धाबे दणाणले असून कारवाई रोखण्यासाठी आरटीओवर दबाब वाढवत असल्याची माहिती आहे.

Web Title: Fake Chechnya number truck on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.