नागपुरात  तोतया पोलीस अधिकाऱ्यास रंगेहात अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 08:47 PM2020-11-25T20:47:07+5:302020-11-25T20:51:17+5:30

Fake police officer arrested, crime news पोलीस अधिकारी बनून लोकांना फसवणारा एक आरोपी गारमेंट व्यापाऱ्याच्या दक्षतेमुळे पोलिसांच्या हाती लाागला. सीताबर्डी पाोलिसांनी त्याला अटक करून तपास सुरु केला आहे.

Fake police officer arrested in Nagpur | नागपुरात  तोतया पोलीस अधिकाऱ्यास रंगेहात अटक 

नागपुरात  तोतया पोलीस अधिकाऱ्यास रंगेहात अटक 

Next
ठळक मुद्देगारमेंट व्यापाऱ्याची दक्षता : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलीस अधिकारी बनून लोकांना फसवणारा एक आरोपी गारमेंट व्यापाऱ्याच्या दक्षतेमुळे पोलिसांच्या हाती लाागला. सीताबर्डी पाोलिसांनी त्याला अटक करून तपास सुरु केला आहे. अजय शिवदास जाधव (६२) रा. बदनपूर, जालना असे आरोपीचे नाव आहे.

सीताबर्डी येथे फ्रेण्ड्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे संचालक गुड्डू अग्रवाल हे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गणवेश व इतर वस्तूंचे अधिकृत विक्रेते आहेत. मंगळवारी रात्री ७.३० वाजता आरोपी जाधव दुकानात आला. तो अग्रवाल यांच्या कर्मचाऱ्यास पोलीस निरीक्षकाचा बॅच मागू लागला. गणवेश किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या साहित्याची विक्री करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून त्याच्या आयकार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर आदींची माहिती घेतली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच बॅचची विक्री केली जात असल्याचे सांगत कर्मचाऱ्याने जाधवला मॅनेजर रामचंद्र डोंगरे यांच्याकडे पाठवले. डोंगरे आणि संचालक गुड्डू अग्रवाल यांना जाधवचे बोलणे ऐकून त्याच्यावर शंका आली. जाधव ऐटीत बोलत होता. मला ओळखत नाही का, अशी विचारणा केली. जाधव हा खाकी पॅन्ट व बेल्ट घालून होता. पिशवीत शर्ट आणि नेमप्लेट दिसत होती. यामुळे तो पोलीस अधिकारी असल्याचे वाटत होते. परंतु त्याचा हावभाव, त्याचे बोलणे यावरून शंका येत होती. त्यांनी जाधवला दुकानात थांबवून ठेवले व सीताबर्डी पोलिसांना सूचना दिली. सीताबर्डी पोलीस लगेच दुकानात पोहोचले. ते जाधवला ठाण्यात घेऊन गेले. विचारपूस केली तेव्हा तो तोतया असल्याचे आढळून आले.

महामार्गावरील ट्रक चालकांना लुटायचा

जाधव हा अनेक दिवसांपासून पाोलीस अधिकारी बनून लोकांची फसवणूक करीत असल्याची माहिती हाती आली. दोन वर्षांपूर्वी तो गणेश टेकडी मंदिर येथे पोलिसांचे जोडे चोरताना साापडला होता. चंद्रपूर पोलिसांनीही त्याला अटक केली होती. जाधव नाव व पत्ताही खोटा असल्याची शंका आहे. तो महामार्गावर ट्रक चालकांना थांबवून चालानच्या नावावर वसुली करतो. तो अनेक दिवसांपासून नागपुरात सक्रिय आहे. त्याच्याकडे असलेला बेल्ट त्याने नुकताच खरेदी केला आहे. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली जात आहे.

Web Title: Fake police officer arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.