तोतया पोलिसांनी गाडी थांबवली, हातचलाखीने सव्वा तोळ्याची चेन उडविली

By योगेश पांडे | Published: May 13, 2024 06:56 PM2024-05-13T18:56:38+5:302024-05-13T18:57:08+5:30

Nagpur : वेकोलिच्या एका कर्मचाऱ्याला तोतया पोलीस कर्मचाऱ्यांनी लुटले

Fake police stopped the car, and looted a man of having chain | तोतया पोलिसांनी गाडी थांबवली, हातचलाखीने सव्वा तोळ्याची चेन उडविली

Fake police stopped the car, and looted a man of having chain

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बाहेरगावावरून मोटारसायकलने नागपुरकडे परत येणाऱ्या वेकोलिच्या एका कर्मचाऱ्याला तोतया पोलीस कर्मचाऱ्यांनी लुटले. त्यांनी वर्धा मार्गावर दुचाकी थांबवत हातचलाखी दाखवत त्यांची सव्वा तोळ्याची चेन लंपास केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शरद भांडेकर (५५, बजरंगनगर) हे वेकोलित कार्यरत आहेत. ११ मे रोजी ते दुपारी दुचाकीने कान्होलीबारा येथे गेले होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते तेथून परतत असताना जामठा येथे त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी थांबविले. दुचाकीतून वास येतो आहे असे सांगत त्यांनी भांडेकर यांना थांबविले. ओळखपत्र दाखवत आपण गुन्हे शाखेत कार्यरत असल्याची बतावणी केली. दुचाकीतून कुठलाही वास येत नसल्याचे भांडेकर यांनी सांगितल्यावर त्यांच्या गळ्यातील चेन एका कागदात काढून ठेवायला सांगितली. आरोपींनी तो कागद एका दुपट्ट्यात करकचून बांधला व भांडेकर यांना दिला. असाच प्रकार त्यांनी आणखी एका दुचाकीस्वारासोबत त्याच वेळी केला. भांडेकर काही अंतर समोर गेले असता त्यांना शंका आली. त्यांनी दुपट्टा उघडून पाहिला असता त्यात नकली चेन होती. भांडेकर यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता तेथे कुणीच नव्हते. त्यांनी हिंगणा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fake police stopped the car, and looted a man of having chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.