नागपुरात तयार झालेले फॉल्कन २०२१ मध्ये भरणार उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:08 PM2018-11-05T23:08:49+5:302018-11-05T23:11:37+5:30
मिहानमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि. (डीआरएएल) च्या शेडमध्ये फॉल्कन २००० विमानाचे पहिले कॉकपिट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे डीआरएएलचा दावा आहे की, २०२१ पर्यंत फॉल्कन पूर्णपणे तयार होऊन उड्डाण भरेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि. (डीआरएएल) च्या शेडमध्ये फॉल्कन २००० विमानाचे पहिले कॉकपिट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे डीआरएएलचा दावा आहे की, २०२१ पर्यंत फॉल्कन पूर्णपणे तयार होऊन उड्डाण भरेल.
यावर्षी जानेवारी महिन्यात धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्कच्या शेडमध्ये फॉल्कनचे निर्माण कार्याला सुरुवात झाली. तीन महिन्यात शेड तयार झाले आणि कॉकपिट बनविण्याचे कामही सुरू झाले. मिळालेल्या माहितीनुसार डीआरएएलमध्ये फ्रान्सचे १० ते १२ अधिकारी आपल्या कुटुंबासह कार्यरत आहे. येथे काम करणारे आयटीआय डिप्लोमा होल्डर, तंत्रज्ञ नागपूरचे आहे. त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रशिक्षणापूर्वी स्थानिक पाच५ इंजिनिअरना प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे भविष्यात एका छोट्या प्लॅण्ट बरोबरच कंपनीद्वारे २६ एकरमध्ये भव्य निर्माण कार्य करण्यात येणार आहे.
२०२१ मध्ये तयार होईल विमान
फॉल्कन २००० विमानाचे सध्या कॉकपिट तयार करण्यात आले आहे. २०२१ पर्यंत नागपुरातच हे विमान तयार होऊन, त्याला रवाना केले जाईल. डीआरएएलचे काही निर्माणाधीन काम वेगाने सुरू आहे. फॉल्कन विमान निर्मितीची प्रगती बघून इतर विमान कंपन्यासुद्धा मिहानमध्ये रुची दाखवित आहे.
दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी, एमएडीसी, नागपूर