आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शुल्क माफ

By admin | Published: June 7, 2017 02:12 AM2017-06-07T02:12:35+5:302017-06-07T02:12:35+5:30

राज्यभरात शेतकरी आंदोलन तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना

For the families of suicide victims, the wages for the children's wages are waived | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शुल्क माफ

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शुल्क माफ

Next

नागपूर विद्यापीठाचा निर्णय : विद्यार्थी संघटनांची होती मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात शेतकरी आंदोलन तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करणार असून याबाबत व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनंतर अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या अद्यापही थांबलेली नाही. आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांची मुले विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतर्फे होत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्यावतीने याबाबत कुलगुरूंना मागील आठवड्यात निवेदनदेखील देण्यात आले होते.
याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता आम्ही या मुद्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात येईल. जर एखादा विद्यार्थी विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात शिक्षण घेत असेल तर त्याचे सर्व शुल्क माफ करण्यात येईल, अशी त्यांनी माहिती दिली.

महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा
याबाबतीत अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीबाबत हस्तक्षेप करणार नाही. संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेश शुल्काचे अधिकार हे महाविद्यालयांना असतात. त्यामुळे यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ. काणे यांनी केले. संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या पाल्यांचे परीक्षा शुल्क हे विद्यापीठाकडे जमा होणार असल्याने ते माफ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: For the families of suicide victims, the wages for the children's wages are waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.