फाटकी पँन्ट का घातली म्हणून घरच्यांनी विचारले... तर त्याने केली आत्महत्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:47 AM2020-08-17T07:47:12+5:302020-08-17T07:59:28+5:30

शनिवारी सकाळी त्याने फाटका पॅन्ट घातला म्हणून घरच्यांनी त्याला रागावले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून तो दिवसभर रागात होता. सायंकाळी तो वरच्या रूममध्ये गेला आणि त्याने गळफास लावून घेतला.

The family asked why he was wearing torn pants ... so he committed suicide .. | फाटकी पँन्ट का घातली म्हणून घरच्यांनी विचारले... तर त्याने केली आत्महत्या..

फाटकी पँन्ट का घातली म्हणून घरच्यांनी विचारले... तर त्याने केली आत्महत्या..

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील एका विद्यार्थ्यासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. १५ ऑगस्टला या दोन्ही घटना घडल्या.
हुडकेश्वरच्या अन्नपूर्णानगरात राहणारा प्रज्वल प्रमोद सलोटे (वय १७) याने शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. प्रज्वलने नुकतीच बारावीची परीक्षा पास केली होती. शनिवारी सकाळी त्याने फाटका पॅन्ट घातला म्हणून घरच्यांनी त्याला रागावले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून तो दिवसभर रागात होता. सायंकाळी तो वरच्या रूममध्ये गेला आणि त्याने गळफास लावून घेतला. रात्री ११.३० च्या सुमारास घरच्या मंडळींनी त्याला आवाज दिला. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी वरच्या माळ्यावर जाऊन बघितले असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.
प्रज्वलचे वडील व्यवसाय करतात, तर आई गृहिणी आहे. त्याला एक छोटा भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लहाने यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: The family asked why he was wearing torn pants ... so he committed suicide ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.