दहा महिन्यांपासून कुटुंब गटाराच्या घाण पाण्यात, तक्रार करुनही कारवाईचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 02:16 PM2021-11-10T14:16:59+5:302021-11-10T14:34:54+5:30

रामटेके यांच्या शेजाऱ्याने गटार लाइनवर अतिक्रमण केले त्यामुळे गटार लाइन फुटली. घाण पाणी रामटेके यांच्या घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे. याबाबत धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र, अधिकारी याची दखल घेत नाही.

family facing sewage leakage problem from 10 months registered complaint but no response | दहा महिन्यांपासून कुटुंब गटाराच्या घाण पाण्यात, तक्रार करुनही कारवाईचा पत्ता नाही

दहा महिन्यांपासून कुटुंब गटाराच्या घाण पाण्यात, तक्रार करुनही कारवाईचा पत्ता नाही

Next
ठळक मुद्देधंतोली झोनचे तक्रारीकडे दुर्लक्ष : परिसरातील लोकांचेही आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गटार लाइन फुटल्याने घरात घाण पाणी साचत असल्याची तक्रार करूनही मनपाचे अधिकारी याची दखल घेत नाहीत. यामुळे धंतोली झोनअंतर्गत प्रभाग ३३ मधील कौशल्यायननगरात गल्ली क्रमांक १५ येथील विशाखा रामटेके यांच्या कुटुंबीयांना मागील दहा महिन्यांपासून घाण पाण्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यांच्यासोबतच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गटर लाइन फुटल्याने आरोग्य धोक्यात आल्याबाबत धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली; परंतु अधिकारी याची दखल घेत नाही. रामटेके यांच्या शेजाऱ्याने गटार लाइनवर अतिक्रमण केले आहे. यामुळे गटार लाइन फुटली आहे. घाण पाणी विशाखा रामटेके यांच्या घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे.

३ फेब्रुवारीला रामटेके यांनी धंतोली झोनमध्ये लेखी तक्रार केली; परंतु अद्याप धंतोली झोन अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने त्यांनी आयुक्त, महापौरांनाही तक्रार दिली. महापौरांनी धंतोली झोनचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. मात्र, याचा उपयोग झाला नाही. अतिक्रमण करणाऱ्याला नोटीस बजावली असल्याचे सांगून अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत.

Web Title: family facing sewage leakage problem from 10 months registered complaint but no response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.