चाकूच्या धाकावर परिवाराला वेठीस धरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:29 PM2018-08-20T23:29:55+5:302018-08-20T23:31:11+5:30

नवदुर्गा कॉलनी, भगिरथ पार्क वानाडोंगरी येथे राहणााऱ्या एका परिवाराला चाकूचा धाक दाखवून तीन लुटारूंनी त्यांच्याच घरात वेठीस धरून रोख तसेच सोन्याचे दागिने हिसकावून नेले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

A family kept under captive showing threat of knife | चाकूच्या धाकावर परिवाराला वेठीस धरले

चाकूच्या धाकावर परिवाराला वेठीस धरले

googlenewsNext
ठळक मुद्देरोख आणि दागिने हिसकावून नेले : एमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवदुर्गा कॉलनी, भगिरथ पार्क वानाडोंगरी येथे राहणााऱ्या एका परिवाराला चाकूचा धाक दाखवून तीन लुटारूंनी त्यांच्याच घरात वेठीस धरून रोख तसेच सोन्याचे दागिने हिसकावून नेले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.
नवदुर्गा कॉलनीत राहणारे संजय श्रीहरी लाकडे (वय ४८) खासगी नोकरी करतात. त्यांची पत्नी शिक्षिका असून, त्यांचा मुलगा दहावीत शिकतो. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर लाकडे परिवार घरात झोपी गेला. सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास किचनच्या लाकडी दाराला तोडून तीन सशस्त्र लुटारू त्यांच्या घरात शिरले. त्यांनी लाकडे दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून आरडाओरड केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देत गप्प राहण्यास सांगितले. घरातील रोख आणि मौल्यवान दागिने तातडीने काढून देण्यास सांगत आरोपींनी त्यांना दम दिला. घाबरलेल्या लाकडे दाम्पत्याने घरातील पाच हजार रुपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने आरोपींच्या हवाली केले. त्यानंतरही आरोपींनी त्यांना ओरडल्यास किंवा पोलिसांना फोन केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन पळ काढला. १५ मिनिटात हा प्रकार घडला. मात्र, भीतीमुळे बराच वेळ गप्प राहिलेल्या लाकडे दाम्पत्याने पहाटे ५ च्या सुमारास एमआयडीसी पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर लाकडे दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.

बाहेरही होते आरोपी ?
लाकडे दाम्पत्याच्या घरात तीन आरोपी पोहोचले असले तरी त्यांचे काही साथीदार बाहेरही पाळतीवर असावेत, असा संशय आहे. आरोपींना लाकडे दाम्पत्याची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती माहिती असावी, असाही संशय आहे. त्यामुळे केवळ त्यांच्याचकडे गुन्हा करून आरोपी पळून गेले. एमआयडीसी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: A family kept under captive showing threat of knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.