नागपुरातील प्रसिद्ध साऊंड आॅपरेटर स्वप्निलचा कर्करोगाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:26 PM2018-08-27T23:26:17+5:302018-08-27T23:27:28+5:30

अतिशय विनम्र, मनमिळाऊ, मेहनती आणि वयोवृद्ध वडिलांसाठी एकमेव आधार असणारा स्वप्निल उईके याची अखेर आज एक्झिट झाली. स्वप्निल गेल्या काही महिन्यांपासून आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त होता. नाशिक येथे उपचार सुरू असताना या तरुण कलावंताचा मृत्यू झाला.

The famous sound operator of Nagpur, Swapnil died of cancer | नागपुरातील प्रसिद्ध साऊंड आॅपरेटर स्वप्निलचा कर्करोगाने मृत्यू

नागपुरातील प्रसिद्ध साऊंड आॅपरेटर स्वप्निलचा कर्करोगाने मृत्यू

Next
ठळक मुद्देनाशिक येथे सुरू होते उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिशय विनम्र, मनमिळाऊ, मेहनती आणि वयोवृद्ध वडिलांसाठी एकमेव आधार असणारा स्वप्निल उईके याची अखेर आज एक्झिट झाली. स्वप्निल गेल्या काही महिन्यांपासून आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त होता. नाशिक येथे उपचार सुरू असताना या तरुण कलावंताचा मृत्यू झाला.
स्वप्निल हा साऊंड आर्टिस्ट म्हणून शहरात प्रसिद्ध होता. त्याचे वडील सत्यवान हे आॅकेस्ट्रा ग्रुपसाठी साऊंड आॅपरेट करायचे. लहान वयापासून स्वप्निल त्यांना हातभार लावत होता. पाचपावलीतील राहत्या घरून तो जबाबदारीने स्वत: वजनी साऊंड सिस्टिम गाडीत टाकायचा, वेळेवर कार्यक्रमात पोहोचायचा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याकाळी ८० च्या दशकातही, वडील सत्यवान यांच्यापेक्षा ‘स्वप्निल तू स्वत: ये आॅपरेट करायला' ही मागणी साऊंड बुक करतानाच जवळपास सर्वच आॅर्केस्ट्रा ग्रुपची असायची. स्वप्निल अतिशय विनम्र होता. कर्करोग तिसऱ्या स्टेजवर असताना त्याच्या आजारपणाची माहिती कळली. त्याचं तरुण वय आणि लढण्याची जिद्द बघता तो सुखरूप परत येईल अशी सर्वांनाच आशा होती. त्याच्या कामाचे स्वरूपच असे होते की खाण्या-पिण्याची त्याची वेळ निश्चित नसायची, मध्यरात्री जेवण व्हायचे, भरपूर सिगारेट पिण्याची सवयही नडली. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. अखेर त्याचा मृत्यू झाला. स्वप्निलच्या पश्चात त्याचे वृद्ध आईवडील, पत्नी व तीन चिमुकल्या मुली आहेत. स्वप्निलच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Web Title: The famous sound operator of Nagpur, Swapnil died of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.