कामठीत गणरायाला उत्साहात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:17+5:302021-09-21T04:10:17+5:30
कामठी : गेल्या अनेक वर्षांपासून कामठी शहर, येरखेडा, रनाळा येथील नागरिक श्री क्षेत्र महादेव घाट, कन्हान नदी येथे गणरायाचे ...
कामठी : गेल्या अनेक वर्षांपासून कामठी शहर, येरखेडा, रनाळा येथील नागरिक श्री क्षेत्र महादेव घाट, कन्हान नदी येथे गणरायाचे विसर्जन करीत होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या वतीने महादेव घाट येथे गणेश विसर्जनावर बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांना विसर्जनाकरिता समस्या निर्माण होऊ नये, याकरिता कामठी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांसह येरखेडा, रनाळा परिसरात कृत्रिम तलावाचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व हजारो नागरिकांनी गणरायाला उत्साहात निरोप देत, कृत्रिम तलावात विसर्जन केले. विसर्जनादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक पोलीस उपायुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे, जुनी कामठीचे ठाणेदार राहुल शिंरे यांच्या नेतृत्वात राज्य राखीव दलाच्या तुकडीसह, होमगार्ड, अति शीघ्र कृती दल, पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.