अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:42+5:302021-06-10T04:07:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : माती भरून जाणाऱ्या भरधाव दहाचाकी ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : माती भरून जाणाऱ्या भरधाव दहाचाकी ट्रकने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वार शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्यांतर्गतच्या गाेसेवाडी परिसरात मंगळवारी (दि.८) रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
श्रीराम श्रावण खाेरगडे (४०, रा. गाेसेवाडी, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत श्रीराम हा एमएच-४०/बीएच-२४७७ क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून गाेसेवाडी येथे राहत्या घरी जात हाेता. यादरम्यान गाेसेवाडी शिवारातील उल्हास चनेकर यांच्या शेतातून मातीची उचल करून आराेपी ट्रकचालक नसीम फहीम अख्तर हा गाेसेवाडीमार्गे एमएच-३२/क्यू-०९४९ क्रमांकाच्या दहाचाकी ट्रकने नागपूरकडे सुसाट जात हाेता. भरधाव ट्रकने समाेर जात असलेल्या श्रीरामच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार श्रीराम हा राेडवर पडून ट्रकच्या चाकाखाली आला. अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत श्रीराम यास नागरिकांनी नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान श्रीरामचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी गावकऱ्यांनी महसूल व पाेलीस यंत्रणेविरुद्ध राेष व्यक्त करीत ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाेलीस वेळीच घटनास्थळी पाेहचल्याने नागरिक शांत झाले. संतप्त नागरिकांनी आराेपी ट्रकचालक नसीम फहीम अख्तर याला पाेलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कैलास विठ्ठल खाेरगडे (३२, रा. गाेसेवाडी, ता. सावनेर) यांच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी आराेपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत. घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असलेल्या श्रीरामच्या अपघाती मृत्यूमुळे खाेरगडे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुले आहेत.
....
मातीची अवैध वाहतूक
गाेसेवाडी शिवारातून माेठ्या प्रमाणावर मातीची उचल करून नागपूर येथे अवैध वाहतूक केली जात आहे. मातीच्या एका राॅयल्टीचा चारदा उपयाेग करून ही अवैध वाहतूक केली जात आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत माती वाहतूक केली जात असल्याचा आराेप गाेसेवाडी येथील संतप्त नागरिकांनी केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाकडे मातीची उचल करून वाहतूक करण्याची राॅयल्टी नसल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. परंतु राॅयल्टीबाबत खापा पाेलिसांनी मात्र माैन बाळगले आहे.