परसाेडी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:22+5:302020-12-29T04:09:22+5:30

कामठी : तालुका कृषी विभागाच्या वतीने परसाेडी (ता. कामठी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयशेजन करण्यात आले हाेते. त्यात शेतकऱ्यांना ...

Farmer Training Camp at Parsadi | परसाेडी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर

परसाेडी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर

Next

कामठी : तालुका कृषी विभागाच्या वतीने परसाेडी (ता. कामठी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयशेजन करण्यात आले हाेते. त्यात शेतकऱ्यांना विविध पिकांवरील किडींचे नियंत्रण, फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच मातीचे आराेग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अवंतिका लेकुरवाळे हाेत्या तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कृषी विभागाचे उपसंचालक अरविंद उपराेकर, तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत, मृदा चाचणी प्रयाेगशाळेचे मून, गाेतमारे, पंचायत समिती उपसभापती आशीष मल्लेवार, उपसरपंच अमाेल माेहाेड, मनाेहर काेरडे, मंडळ अधिकारी (कृषी) व्ही. एल. गावंडे, कृषी पर्यवेक्षक मनीष माळाेदे उपस्थित हाेते. याप्रसंगी शेतकऱ्यांना जमिनीचा पाेत कायम कसा राखायचा, माती परीक्षणाचे महत्त्व, पिकांना आवश्यक असलेले सेंद्रिय घटक, त्याची पूर्तता, उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी, विविध किडींचे नियंत्रण यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन डी. बी. बोरसे यांनी केले तर विलास मोहोड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्थानिक व परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.

Web Title: Farmer Training Camp at Parsadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.