शेतकऱ्यांचा भारत बंद, विविध संघटनांचा सहभाग.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:11+5:302020-12-09T04:07:11+5:30

शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने संविधान चौकात धरणे -नारे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे चर्चेविना ...

Farmers closed in India, participation of various organizations ..... | शेतकऱ्यांचा भारत बंद, विविध संघटनांचा सहभाग.....

शेतकऱ्यांचा भारत बंद, विविध संघटनांचा सहभाग.....

Next

शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने संविधान चौकात धरणे -नारे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे चर्चेविना संमत केले आहेत. हे कायदे शेती व शेतकरी विरोधी आहेत .म्हणून देश भरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलन समर्थनार्थ कष्टकरी जन आंदोलनचे विलास भोंगाडे, रोशनी गंभीर, वैशाली पाटील ,सरिता जुनघरे,अश्विनी भारद्वाज यांनी नारे निदर्शने करून धरणे दिले.

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील ५०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली हाेती. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून या बंदमध्ये सहभागी झाले. यामध्ये सी.आय. टी.यू. संघटनेनेही सहभाग घेतला हाेता. आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनने बंदला पाठिंबा देत संप केला. मंगळवारी संविधान चौक येथे धरणे आंदाेलन केले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, कांचन बोरकर, रूपलता बोंबले, शुभांगी चिचमलकर, माया कावळे, गीता विश्वकर्मा, ज्योती कावळे, रिया रेवतकर, वैशाली टेकाडे, मंदा गांधारे, रेखा पानतावणे, मंदा जाधव, अरणा शेंडे, संगीता मेश्राम, यांच्या नेतृत्वात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: Farmers closed in India, participation of various organizations .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.