शेतकरी भावांनाे, थाेडं थांबा! ‘पॅनिक सेल’ करू नका, कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज

By सुनील चरपे | Published: December 17, 2022 02:30 PM2022-12-17T14:30:06+5:302022-12-17T14:31:00+5:30

कापसाचे उत्पादन किमान ४५ लाख गाठींनी घटणार असल्याचा अंदाज

Farmers don't rush to 'panic selling' cotton, production projected to decline | शेतकरी भावांनाे, थाेडं थांबा! ‘पॅनिक सेल’ करू नका, कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज

शेतकरी भावांनाे, थाेडं थांबा! ‘पॅनिक सेल’ करू नका, कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज

googlenewsNext

नागपूर : १ ऑक्टाेबर ते १४ डिसेंबर या मागील वर्षीच्या तुलनेत चालू हंगामाच्या किमान ११८.८३ लाख गाठी कापूस देशभरातील बाजारात येणे अपेक्षित असताना ५८ लाख ०९ हजार ६८४ गाठी कापूस बाजारात आला. या आकडेवारीवरून देशभरातील बाजारात कापसाची आवक १७.६३ टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट हाेते. आवक घटल्याने पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरने वाढूनही देशभरातील कापसाचे उत्पादन किमान ४५ ते ५० लाख गाठींनी घटणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सन २०२१-२२ मध्ये देशभरात ११५ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली हाेती. १ ऑक्टाेबर ते १४ डिसेंबर २०२१ या काळात १०६ लाख १४ हजार ५०० गाठी म्हणजेच एकूण उत्पादनाच्या ३४.४६ टक्के कापूस देशांतर्गत बाजारात आला हाेता. सन २०२२-२३ मध्ये कपाशीचे पेरणीक्षेत्र १२५ लाख हेक्टरवर पाेहाेचले. या काळात किमान ११८.८३ लाख गाठी कापूस बाजारात येणे अपेक्षित असताना ५८ लाख ०९ हजार ६८४ गाठी कापूस बाजारात आला.

सन २०२१-२२ च्या हंगामात देशभरात एकूण ३६२ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) व्यक्त केला हाेता. कापूस वर्ष संपेपर्यंत ३०७.६ लाख गाठी कापसाची बाजारात आवक झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन ५४.४ लाख गाठी कापसाचे उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले.
सन २०२२-२३ मध्ये एकूण ३७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. नंतर ३४५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचे सीएआयने स्पष्ट केले. या हंगामात २९० ते ३०० लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशभरातील कापसाची आवक (१ ऑक्टाेबर ते १४ डिसेंबर) (गाठी) राज्य सन-२०२१ सन-२०२२

  • पंजाब - ३,१०,००० - ८१,२४९ - २,२८,२४९ कमी
  • हरयाणा - ५,६०,००० - ४,२७,३३५ - १,३२,६६५ कमी
  • राजस्थान - ११,५०,००० - ११,२८,८०० - २१,२०० कमी
  • गुजरात - २६,१०,५०० - १७,००,००० - ९,१०,५०० कमी
  • महाराष्ट्र - २३,३०,००० - ७,४९,००० - १५,८१,००० कमी
  • मध्य प्रदेश - ७,५४,५०० - ४,५७,००० - २,९७,५०० कमी
  • तेलंगणा - ११,५०,००० - ३,३९,५०० - ८,१०,५०० कमी
  • आंध्र प्रदेश - ५,९०,००० - ३,५०,८०० - २,३९,२०० कमी
  • कर्नाटक - ९,५०,५०० - ४,५२,००० - ४,९८,५०० कमी
  • तामिळनाडू - ५०,००० - १,००,००० - ५०,००० अधिक
  • ओडिशा - ७०,००० - १५,००० - ५५,००० कमी
  • इतर - ९०,००० - ८,००० - ८२,००० कमी

एकूण - १,०६,१४,५०० - ५८,०८,६८४ - ४८,०५,८१६ कमी

आवक स्थिर ठेवणे गरजेचे

आर्थिकदृष्ट्या बाजारातील कापूस साठवणूक क्षमता सध्या संपली आहे. कापसाची आवक वाढल्यास बाजारातील आर्थिक दबाव वाढू शकताे. अशा परिस्थितीत दर काेसळण्याची भीती असते. हा आर्थिक दबाव वाढू नये, यासाठी शेतकऱ्यांनीच स्वत: स्टाॅकिस्ट हाेऊन बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवणे गरजेचे आहे.

फार थाेड्या जिनिंग प्रेसिंग सुरू

एक जिन पूर्ण क्षमतेने चालवायला राेज किमान एक हजार क्विंटल कापसाची आवश्यकता असते. राेज १५० ते २०० क्विंटल कापूस मिळत असल्याने आठवड्यातून केवळ एक ते दीड दिवस जिन चालवावा लागताे. सध्या जिनिंग प्रेसिंग चालविणे कठीण झाले असून, देशातील फार थाेडे जिनिंग प्रेसिंग सुरू असल्याची माहिती मालकांनी दिली.

भारतासाेबत जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन कमी हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कमी उत्पादनामुळे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांनी घाई न करता गरजेपुरता कापूस विकावा. उर्वरित कापूस टप्प्याटप्प्याने विकावा.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र

सध्या चढ-उतार असला, तरी कापसाचे दर स्थिर राहतील. आवक वाढली तर दर काेसळतील. सरकीचे दर कमी झाल्याने कापसाच्या दरावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी न घाबरता बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी.

- विजय निवल, माजी सदस्य, काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड

Web Title: Farmers don't rush to 'panic selling' cotton, production projected to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.