काटाेल येथे शेतकऱ्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:25+5:302021-07-02T04:07:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : पंचायत समितीच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. ...

Farmers' grievances at Katail | काटाेल येथे शेतकऱ्यांचा गाैरव

काटाेल येथे शेतकऱ्यांचा गाैरव

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : पंचायत समितीच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषिदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील शेतकऱ्यांचा गाैरव करण्यात आला.

पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी खंडविकास अधिकारी संजय पाटील, कीटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी प्रास्ताविकात हरित क्रांतीचे प्रणेते, राज्य राेजगार हमी याेजनेचे जनक व अधिक उत्पन्न देणाऱ्या संकरित वाणांचा प्रसार अशा विविध कार्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमात रबी हंगाम २०२१ पीक स्पर्धेंतर्गत गहू, हरभरा पिकांचे तालुकास्तरावरील सर्वसाधारण गट व आदिवासी गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. हरभरा सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक दिलीप बागडदे रा. गुजरखेडी (उत्पन्न हेक्टरी ३३ क्विंटल), द्वितीय शंकर चांदेकर रा. काेतवालबर्डी (उत्पन्न हेक्टरी २८ क्विंटल) तर तृतीय क्रमांक महेंद्र ढवळे रा. काेंढाळी (उत्पन्न हेक्टरी २३.२५ क्विंटल) यांनी प्राप्त केला. आदिवासी गटात प्रथम क्रमांक शालिकराम येडमे रा. बाेरडाेह (उत्पन्न हेक्टरी १७.९१ क्विंटल), द्वितीय हरिचंद्र युवनाते रा. बाेरडाेह (उत्पन्न हेक्टरी १५.२७ क्विंटल) तर तृतीय क्रमांक रमेश वाडीवा रा. माळेगाव (उत्पन्न हेक्टरी १०.७० क्विंटल) यांनी पटकावला. गहू पीक सर्वसाधारण गटात ताराचंद्र साठे रा. चिंचोली (उत्पन्न हेक्टरी ३९ क्विंटल) प्रथम, अभिजित धोटे रा. खुटांबा (उत्पन्न हेक्‍टरी ३५.६४ क्विंटल) द्वितीय तर रवी जयस्वाल रा. कलकुही (उत्पन्न हेक्‍टरी ३५.५० क्विंटल) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी विक्रम भवारी, सागर अहिरे तसेच पंचायत समिती व कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी सचिन गाेरटे यांनी केले तर, आभार मंडळ कृषी अधिकारी संदीप ढाेणे यांनी मानले.

Web Title: Farmers' grievances at Katail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.