गुरांच्या चाेरीमुळे शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:42+5:302021-02-05T04:38:42+5:30
सावनेर : ग्रामीण भागात गुरांच्या चाेरीचे प्रमाण वाढत चालल्याने तसेच पाेलीस प्रशासन या चाेरीकडे गांभीर्याने बघत नसल्याने शेतकरी हैराण ...
सावनेर : ग्रामीण भागात गुरांच्या चाेरीचे प्रमाण वाढत चालल्याने तसेच पाेलीस प्रशासन या चाेरीकडे गांभीर्याने बघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दुभती जनावरे व बैलजाेडी चाेरीला जात असल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात गाेठ्यांचे बांधकाम केले असून, त्या गाेठ्यांमध्ये त्यांची सर्व जनावरे असतात. रात्रीच्यावेळी शेतात अथवा गाेठ्यात कुणीही राहात नसल्याने चाेरटे गाेठ्यांना लक्ष्य करीत आत बांधलेली जनावरे चाेरून नेतात. चाेरटे बैलाजाेडी दुभत्या जनावरांसह वासरं चाेरून नेत असल्याने शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण हाेत असून, त्यांना आर्थिक नुकसानही साेसावे लागते. तालुक्यात आजनी व हत्तीसरा शिवारात गुरांच्या चाेरीचे प्रमाण अधिक आहे. चाेरटे ही जनावरे कत्तलखान्यात नेऊन विकत असावेत, अशी शक्यता महादेव आगरकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, पाेलिसांनी या चाेरट्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.