वीज काेसळून शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:35+5:302021-07-09T04:07:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्याने शेतातील झाडाखाली आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज त्या झाडाच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्याने शेतातील झाडाखाली आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज त्या झाडाच्या परिसरात काेसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी शिवारात गुरुवारी (दि. ८) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
भीमराव कोल्हे (२७, रा. तिडंगी, ता. कळमेश्वर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून, गुरुवारी स्वत:च्या शेतात फवारणी करायला गेले हाेते. फवारणी करताना मध्येच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी फवारणी थांबवून शेतातील झाडाखाली हातात छत्री घेत आश्रय घेतला.
दरम्यान, जाेरात कडाडलेली वीज झाडाजवळ काेसळल्याने ते बेशुद्ध पडले. ही बाब शेतातील झाेपडीत असलेल्या त्यांच्या आईच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. नागरिकांनी लगेच घटनास्थळ गाठून भीमराव यांना उपचारासाठी सावनेर शहरात नेले. विजेमुळे ते हाेरपळले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.