साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:03+5:302021-06-25T04:08:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के ...

Farmers roam for soybean seeds | साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के पेरणी पूर्ण झाली हाेती. त्यातच साेयाबीनच्या पेरणीनंतर मुसळधार पाऊस काेसळल्याने तसेच पावसाचे पाणी पेरणीच्या चऱ्यांमध्ये साचून राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बाजारात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाण्यांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.

चिचाळा (ता. भिवापूर) परिसरातील चिचाळा, पाहमी, बोटेझरी, गरडापार, मालेवाडा, उखळी, सरांडी, मांडवा, शिवापूर या शिवारात साेयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून, बहुतांश पेरणी १२ जूनपर्यंत आटाेपली हाेती. परंतु, पेरणी केलेले साेयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आणि चिंतेत भर पडली. बियाणे नेमके मुसळधार पावसामुळे उगवले नाही की त्याची उगवणक्षमताच कमी हाेती, हे कळायला मार्ग नाही.

कृषी सेवा केंद्रांमध्ये साेयाबीन बियाणे मिळत नसल्याने काहींनी शेतकऱ्यांकडे घरगुती साेयाबीन बियाणे खरेदी केले. घरगुती बियाणेही ८ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दराने खरेदी करावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कंपनीच्या बियाण्यांचा दर ११ ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे पीक कर्ज मिळत नाही, दुसरीकडे बियाणे मिळत नसून खरेदीसाठी पैसेही नाही, अशा तिहेरी संकटात सापडलाे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शाेध

दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाची निवड केली असून, साेयाबीन बियाण्यांच्या शाेधात शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, गिरड, काेरा व समुद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील तसेच तालुक्यातील गावांमधील कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

...

उगणवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह

मागील हंगामात खाेडकीड, मूळकुज व येल्लाे माेझॅकमुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून वाचलेले साेयाबीनचे पीक कापणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे भिजले. त्यामुळे त्या बियाण्यांची उगवण क्षमता जेमतेम असतानाही कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरगुती बियाणे त्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे पेरण्याबाबत जनजागृती केली. मात्र, संपूर्ण राज्यभर साेयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा असून, साेयाबीला पर्याय म्हणून दुसरे प्रभावी पीक घेण्याबाबत कुणीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भरीस पडले नाही.

Web Title: Farmers roam for soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.