प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:41+5:302021-07-02T04:07:41+5:30
कळमेश्वर : प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी उद्यान पंडित बाबाराव कोढे यांनी केले. कृषी दिनाचे औचित्य ...
कळमेश्वर : प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी उद्यान पंडित बाबाराव कोढे यांनी केले. कृषी दिनाचे औचित्य साधत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर कृषी महाविद्यालयात नागपूर जिल्ह्यातील सहा प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी कोढे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य डॉ. ई. डी. माई यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा झाला. याप्रसंगी कृषी विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. राठोड, डॉ. प्रा. अरुण इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. सत्कारमूर्ती कोढे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
कोढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आधी पीक नियोजन करणे आवश्यक आहे. यासोबतच परंपरागत शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास फळबाग शेती फायद्याची ठरते. पिकांचे नियोजन, मशागत खर्च व व्यवस्थापन यांचे काटेकोर नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.