शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी व्हावे : भीमराव कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:40 IST2019-01-20T23:39:57+5:302019-01-20T23:40:51+5:30
शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी व्हावे : भीमराव कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत: संत्रा विक्रीसाठी पुढे यावे. राज्य शासनाने विक्रीची व्यवस्था केली आहे. ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मोठे साधन आहे. याकरिता थोडेफार प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आता स्वत:च बाजारात संत्री विकत असल्यामुळे अडीच पट उत्पन्न मिळत आहे. उदाहरण देताना कडू म्हणाले, कळमना बाजारात दोन हजार रुपये टन भावाने संत्री विकली जातात. त्याकरिता तीन हजार रुपये टन वाहतूक खर्च येतो. पण भावाला पुणे येथे पाठवून संत्रा विक्रीचा गट तयार केला. २० हजार रुपये टन किमतीचा संत्रा पुणे येथे पाठवितो. त्याकरिता ८ हजार रुपये वाहतूक खर्च येतो. हा संत्रा राज्य पणन महासंघाने उभ्या केलेल्या आठवडी बाजारात ५० हजार रुपये टनापर्यंत विकला जातो. या प्रक्रियेत मला २० हजार आणि भावाला २२ हजार रुपये मिळतात. सर्व उत्पन्न घरातच आहे. कडू यांची कळमेश्वर तालुक्यात पारडी-देशमुख येथे २० एकरवर संत्र्याची बाग आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलसारखे माध्यम संत्रा उत्पादकांना लोकमतने उपलब्ध करून दिले आहे. पण चर्चासत्रात शेतकऱ्यांची हजेरी कमी असल्यावर त्यांनी खंत व्यक्त केली.