शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:02 AM2018-08-10T11:02:00+5:302018-08-10T11:04:10+5:30

शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.

Farmers should take the torch of revolution in their hands | शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

Next
ठळक मुद्देकिसान अधिकार यात्रेचे स्वागतशेतकरी नेत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ४५ वर्षांत काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच न केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन ते आत्महत्येकडे वळले. शेतकऱ्यांना या कर्जातून बाहेर काढून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षानेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी आत्महत्या आणखीनच वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ही आरपारची लढाई असून, शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.
काश्मीर ते कन्याकुमारी किसान अधिकार यात्रेचे गुरुवारी दुपारी ३ वाजता संविधान चौकात आगमन झाले. यात्रेत सहभागी विविध राज्यातील शेतकरी नेत्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, जय जवान जय किसान संघटनेचे संयोजक प्रशांत पवार, काश्मीरचे शेतकरी नेते हमीद मलिक, मध्य प्रदेशचे शेतकरी नेते शिवकुमार शर्मा, यात्रेचे समन्वयक अभिमन्यू कोहाड, हरियाणाचे गुरुनाम चंडोणी, पंजाबचे जगजितसिंह दल्लेवाल, उत्तर प्रदेशचे हरपालसिंह, राजस्थानचे सतबीरसिंह, केरळचे ए. बी. बिजू, कर्नाटकचे शांताकुमारजी, छत्तीसगडचे राजकुमार गुप्ता उपस्थित होते. माजी खासदार नाना पटोले यांनी उद्योगपतींकडून टॅक्स वसूल करून तो गरिबांचे आरोग्य, शिक्षणासाठी वापरण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. परंतु भाजप सरकार गरिबांकडून वसूल करून उद्योगपतींच्या घशात पैसे ओतत असल्याचा आरोप केला. इंग्लंडप्रमाणे शासनाने शेतीत ८५ टक्के भागीदारी करण्याची मागणी करून आगामी निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ईव्हीएम मशीनविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आमदार बच्चू कडू यांनी भारताला बदलविण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. अन्यथा भगतसिंग यांच्या मार्गावर जाऊन किसान संघटनेचे किसान सैन्यात रूपांतर करण्याची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले. अभिमन्यू कोहाळ यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसून शासनाकडून त्या झालेल्या हत्या असल्याचा उल्लेख केला. हमीद मलिक यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत असल्याचे सांगितले. गुरुनाथसिंग चंदुरी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे १५ दिवसाचे वेतन आणि शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई सारखी असल्याचे सांगून यामुळेच आत्महत्या वाढल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खोत यांनी शासनाची धोकेबाजी उघड करण्यासाठी ही यात्रा काढल्याचे स्पष्ट केले. शिवकुमार शर्मा यांनी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांची लूट करणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालन अक्षता दमने यांनी केले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन श्रीकांत तराळ यांनी केले.

Web Title: Farmers should take the torch of revolution in their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी