शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:28+5:302021-06-28T04:07:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून ताे बाजारात विकावा. यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळायला पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर ऑरगॅनिक ॲग्रो प्रोड्युसरचे संचालक गजानन गिराेलकर यांनी रामटेक तालुक्यातील किरणापूर (काचूरवाही) येथे आयाेजित शेतीची औद्योगिकतेकडे वाटचाल या विषयावरील कार्यशाळेत केले.
या कार्यशाळेचे आयाेजन नागपूर येथील कृषी भारत वृत्त संस्था व रामटेक येथील आकाशझेप फाऊंडेशनच्यावतीने आम्ही भारतीय अभियानांतर्गत करण्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक तुरीचे बियाणे मोफत वाटण्यात आले. शेतकऱ्यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गजानन गिरोलकर यांचा गाैरवही करण्यात आला.
प्रफुल्ल राऊत यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. संचालन साक्षोधन कडबे यांनी केले तर श्याम कडू यांनी आभार मानले. याप्रसंगी आकाशझेपचे संचालक वैभव तुरक, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुथे, उदाराम हूड, शेषराज कुथे, भोजराज वानखेडे, दुतियोधन कडबे, कपिल देवगडे, कीर्तीकुमार कुथे, कुणाल हूड, वसंता कुथे, घनश्याम ठाकरे, विशाल हूड, गोपाल हूड, अविनाश कुथे, नारायण चौधरी, हरीश हूड, विठ्ठल कडू, बारीक मेश्राम, राहुल ठाकरे, परमेश्वर ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.