भविष्यात हवामान विम्याचा शेतकऱ्यांना आधार : सुधीर मेश्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 08:32 PM2018-01-16T20:32:01+5:302018-01-16T20:34:17+5:30
वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्यायाने देशाचा विकास घडवू शकतील. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास राष्ट्र्संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. सुधीर मेश्राम यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्यायाने देशाचा विकास घडवू शकतील. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास राष्ट्र्संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. सुधीर मेश्राम यांनी व्यक्त केला.
ग्लोबल बायोटेक फोरम आणि राष्ट्र्संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय ‘ग्लोबल फ्युचरिस्टीक ट्रेंड्स इन लाईफ सायन्स’ आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
कार्यक्र माच्या उद्घाटनाप्रसंगी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय प्रमुख वक्ते म्हणून कोरिया मेरिटाईम ओशन युनिव्हर्सिटी, बुसान दक्षिण कोरियाचे प्रा. कीम युन हैए, सीईटीवायएस विद्यापीठ मेक्सिको येथील शिक्षण विभागाचे अधिष्ठाता प्रा.स्कॉट वेनेझयिा, एनओएए को-आॅपरेटिव्ह रिमोट सेंन्सिंग सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी केंद्र युएसएचे प्रा.तारेंद्र लाखनकर, टोकुशिमा विद्यापीठाचे डॉ. पंकज कोईनकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्राध्यापक आणि टाटा कॉफी लिमिटेड बंगळुरु चे संचालक प्रा. पी. जी. चेनगप्पा, परिसंवादाचे संयोजक डॉ.अशोक डोंगरे उपस्थित होते.
सुधीर मेश्राम यांनी २१ व्या शतकातील आव्हानांचा उल्लेख करीत लोकसंख्येच्या तुलनेत जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. कमी जमिनीवर अधिक उत्पादनाची पद्धती ही केवळ प्रयोगशाळेपुरतीच मर्यादित आहे. ही पद्धती येत्या काळात प्रयोगशाळेबाहेर आणणे. याशिवाय वनस्पती, प्राणी व अन्य संसाधनाचा वापर करु न जमिनीचा कस वाढवण्यावर भर देणार आहेत. विदेशी विमा कंपन्यांनी पुढाकार घेत येणाऱ्या काळात विविध देशातील ४०० दशलक्ष शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’चा लाभ देण्याची तयारी दर्शविली आहे. २०२० पर्यत शेतकरी हा केवळ पीक विमाच नव्हे तर हवामान विम्याचा लाभ घेत बदलत्या वातावरणात सर्वच पिकांचे रक्षण करु शकेल. आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून बौद्धिक संपदाचे जतन करु न येथील विचार भारतासह अन्य देशांपर्यत पोहोचिवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
डॉ. नरेंद्र चौधरी यांनी विज्ञानाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला थेट कंपन्यापर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. ज्याप्रमाणे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग करण्यात आला त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शेतीवर प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
प्रा. पी. जी. चेनगप्पा यांनी देखील विज्ञानाच्या वापराने विकास ही संकल्पना अमलात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना विज्ञानाचा योग्य वापर करण्याची शिकवण देण्याचे आवाहन केले. उपस्थित वक्त्यांनी यावेळी विचार व्यक्त करीत परिसंवाद आयोजकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्र माचे उद्घाटन दीपप्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आले. कार्यक्र माचे संचालन प्रा. चित्रा लाडे यांनी केले.