विदर्भातील शेतक-यांना रब्बी हंगामातील हरभरा पेरणी तंत्रज्ञानाचे धडे!
By admin | Published: October 31, 2016 11:33 PM2016-10-31T23:33:16+5:302016-10-31T23:33:16+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अनुदान; बीजोत्पादनावर देणार भर.
अकोला, दि. ३१- रब्बी हंगामातील हरभरा पिकावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, विदर्भातील शेतकर्यांना शेतावर जाऊन हरभरा लागवड तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यावर्षी या उपक्रमासाठी अनुदान उपलब्ध करण्यात आले असून, हरभरा बीजोत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे.
येत्या हंगामात या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विदर्भात प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात अकोला तालुक्यातील कापशी, म्हैसपूर, वाशिंबा व सोनाळा येथून करण्यात आली आहे. हरभर्याचे भरघोस उत्पादन व्हावे, तद्वतच शेतकर्यांनी शेतावरच दज्रेदार बियाणे उत्पादन घ्यावे, यासाठी या गावातील शेतकर्यांना हरभरा पेरणी तंत्रज्ञानावर प्रशिक्षण दिले जात आहे.
विदर्भातील कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र ह्यहरभरा लागवड तंत्रज्ञानह्ण या विषयावर एका दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.पी.जी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमात कृषी अधिकार्यांसह डॉ. विकास गौड, डॉ. प्रेरणा चिकटे, अर्चना चव्हाण शेतकर्यांना हरभरा पेरणी तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देत आहेत.
दरम्यान, पावसाच्या अनिश्चिततेमुळे मागील चार ते पाच वर्षांंपासून रब्बी हरभरा पिकाचे उत्पादनावर सारखा प्रतिकूल परिणाम होत असल्याने यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला हरभरा बियाणे मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. शेवटी हैदराबाद येथून एक लाख क्विंटल बियाणे महाबीजला मिळाले. पण, हेही बियाणे कमी पडत असल्याने शेतकर्यांना अनुदानावरील बियाणे मिळणे कठीण झाले आहे.
या पृष्ठभूमीवर यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी पिकांसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे यावर्षी भरघोस उत्पादन घेता यावे, याकरिता शेतकर्यांना पेरणी तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षणातून दिली जात असून, शेतकर्यांनी स्वत:चा दज्रेदार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यावर भर दिला जात आहे.
शेतकर्यांनी चांगले दज्रेदार उत्पादन घ्यावे, याकरिता शेतकर्यांना हरभरा पेरणी तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जात आहे. तद्वतच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विदर्भात प्रकल्प राबविण्यात येत आहे.
डॉ. प्रदीप इंगोले,
संचालक विस्तार शिक्षण,
डॉ. पंजाबराव देशममुख कृषी विद्यापीठ, अकोला.