निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदतीची भूमिका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

By योगेश पांडे | Published: October 25, 2022 12:09 PM2022-10-25T12:09:53+5:302022-10-25T12:15:13+5:30

''अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही''

Farmers who have suffered losses due to heavy rains will get compensation says cm eknath shinde | निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदतीची भूमिका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदतीची भूमिका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

Next

नागपूर : परतीच्या पावसाचे पंचनामे करायला सांगितले आहे. निकषात बसो अथवा न बसो, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ. त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते बोलत होते. 

दिवाळी गडचिरोलीच्या जवानांसोबत 

राज्याच्या सीमेवर असलेले पोलीस जवान आणि सी-69 जवान आपला जीव धोक्यात टाकून आणि कुटुंबास दूर राहून आपला कर्तव्य बजावत असतात. पालकमंत्री असताना गडचिरोलीच्या जवानांसोबत मी दरवर्षी दिवाळी साजरा करत होतो. आता मुख्यमंत्री असतानाही मी त्यांच्यात जाणार आहे. अति दुर्गाम भागात आपले जवान नक्षलवाद्यांशी लढून आपले रक्षण करतात. त्यांच्या जीवनात दिवाळी प्रकाश घेऊन यायला पाहिजे. त्यांनादेखील सण उत्सवाचा आनंद घेता आला पाहिजे. याच उद्देशाने मी त्यांच्याकडे भामरागडला जातोय आणि दिवाळी साजरी करतोय, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नाना पटोले यांचे भाषण हास्यास्पद

नाना पटोलेचं भाष्य हास्यस्पद आहेय. तीन महिन्यात आम्ही 72 मोठे निर्णय घेतले आहेय. ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला सुद्धा मोठं यश मिळालं. विरोधी पक्षाच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबरमध्ये 

आपण समृद्धी शिर्डी पर्यंत लवकरात सुरू करणार आहोत, नोव्हेंबरमध्ये समृद्धीचं उदघाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Farmers who have suffered losses due to heavy rains will get compensation says cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.