शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:45+5:302021-08-12T04:10:45+5:30

नागपूर : मागील पाच वर्षात जिल्ह्यात ज्वारीचा पेरा निम्म्यावर आला आहे. २०१६-१७ मध्ये ज्वारीचे असलेले पेरणी क्षेत्र आता पाच ...

Farmers will have to buy sorghum and eat it! | शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार !

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन खावी लागणार !

Next

नागपूर : मागील पाच वर्षात जिल्ह्यात ज्वारीचा पेरा निम्म्यावर आला आहे. २०१६-१७ मध्ये ज्वारीचे असलेले पेरणी क्षेत्र आता पाच वर्षानंतर ५५ हेक्टरवरून २८ हेक्टरवर आले आहे. यामुळे ज्वारी महाग आणि त्या तुलनेत गहू स्वस्त झाल्याचे चित्र बाजारात आहे.

ज्वारी हे एके काळी गरिबांचे अन्न होते. मागील काळात ज्वारीच्या भाकरीला पंचतारांकीत हॉटेलातही भाव आला. एवढे नाही तर लग्नकार्य आणि पार्ट्यामध्येही भाकरीचा मेनू हमखास ठेवला जाऊ लागला. शेतकऱ्यांच्या शेतात एके काळी खंडीने पिकणारी ज्वारी आता केवळ हुरड्यापुरती मर्यादित राहिली आहे. यामुळे खुद्द शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेऊन भाकरी खाण्याची वेळ आली आहे.

दिवसेंदिवस ज्वारीचा पेरा कमी होत आहे. ज्वारीऐवजी शेतकऱ्यांना मक्यासारखे हमखास उत्पन्नाचे पर्यायी पीक गवसल्याने हा बदल झाल्याचे सांगितले जात आहे.

...

असा घटला ज्वारीचा पेरा (हेक्टर्समध्ये)

२०१६-१७ : ५५ हेक्टर्स

२०१७-१८ : ४८ हेक्टर्स

२०१८-१९ : ४० हेक्टर्स

२०१९-२० : ३० हेक्टर्स

२०२०-२१ : २८ हेक्टर्स

...

यंदा कोणत्या पिकाचा किती पेरा?

पीक पेरा (हेक्टर्समध्ये)

कापूस - २,१०,५७९.२

भात - ५८,५०५.१

ज्वारी - २,८३७

मका - ३,७६५.५

तूर - ६३,५८४.९५

मूग - ३५१.१

उडीद - १०५२

इतर - १०८

भुईमूग - १,११७.८

तीळ - ५१.२

सोयाबीन - ९२,३३१.४

इतर - ५५

एकूण पेरणी क्षेत्र - ४,३२,८३०.३५

...

३) का फिरविली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ? (कृषी अधिकाऱ्याचा कोट)

शेतकऱ्यांना मक्यासारखे पर्यायी पीक मिळाले आहे. मक्याला नगदी बाजारपेठ आहे. पशु खाद्य म्हणून पणन मंडळाकडून खरेदीला वाव आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल घटल्याने ज्वारीचे पेरा क्षेत्र मागील पाच वर्षात घटले आहे.

- मिलिंद शेंडे, कृषी अधीक्षक, नागपूर

...

शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक (दोन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)

१) ज्वारीचे पीक निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात हमखास उत्पन्न होईलच, याची शाश्वती नाही. जनावरांना वैरण म्हणून कडबा कामी यायचा. मात्र, आता जनावरेही घटल्याने कडब्याला म्हणावा तसा उठाव राहिलेला नाही.

- दिलीप डाखोळे, वरोडा, ता. कळमेश्वर

२) आमच्या परिसरात अनेक शेतकरी आता मक्याचे पीक घेत आहेत. यासोबतच कापसाचा पेरा वाढल्याने सोबत तुरीचे पीक घेतले जात असल्याने ज्वारीच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांचा कल घटला आहे.

- कुणाल मुळे, हिवरा-हिवरी, ता. उमरेड

...

Web Title: Farmers will have to buy sorghum and eat it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.