जानेवारीपासून चारचाकी वाहनात फास्टॅग अत्यावश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:42 AM2020-11-09T10:42:58+5:302020-11-09T10:43:30+5:30
Nagpur News Fastag नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन अथवा जुन्या चारचाकी वाहनांना फास्टॅग आवश्यक असणार आहे. यात १ डिसेंबर २०१७ च्यापूर्वी विकलेले एम व एन कॅटॅगिरीच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन अथवा जुन्या चारचाकी वाहनांना फास्टॅग आवश्यक असणार आहे. यात १ डिसेंबर २०१७ च्यापूर्वी विकलेले एम व एन कॅटॅगिरीच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅगच्या आवश्यकतेसंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे सेंट्रल मोटर व्हेईकल १९८९ मध्ये संशोधन करण्यात आले आहे. सूत्रानुसार यापूर्वी १ डिसेंबर २०१७ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग आवश्यक होते. नॅशनल परवाना असलेल्या वाहनांना १ ऑक्टोबर २०१९ पासून फास्टॅग अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर फॉर्म ५१(इन्शुरन्स सर्टिफिकेट)मध्ये बदल करून थर्ड पार्टी इन्शुरन्स करताना वैध फास्टॅग आवश्यक केले आहे. इन्शुरन्स सर्टिफिकेटसाठी संशोधन एप्रिल २०२१ पासून लागू होईल.
एनएचएआयने नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत सर्व टोल नाक्यांवर ७० ते ८० टक्के टोल वसुली फास्टॅग अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत आहे. शिल्लक २० ते ३० टक्के वाहनांची रोख वसुली करण्यासाठी ‘लेन’ उपलब्ध केली आहे. पण पूर्णपणे फास्टॅग आवश्यक झाल्यावर रोख वसुलीसाठी उपलब्ध केलेल्या ‘लेन’ला इलेक्ट्रॉनिक टोलमध्ये बदलविण्यात येणार आहे.