नागपुरात चालले तरी काय ? पोलिसांत ‘टीप’ दिल्याने तडीपार गुंडावर जीवघेणा हल्ला

By योगेश पांडे | Published: July 17, 2023 05:54 PM2023-07-17T17:54:23+5:302023-07-17T17:55:16+5:30

बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Fatal attack on Tadipar goon after giving a 'tip' to the police | नागपुरात चालले तरी काय ? पोलिसांत ‘टीप’ दिल्याने तडीपार गुंडावर जीवघेणा हल्ला

नागपुरात चालले तरी काय ? पोलिसांत ‘टीप’ दिल्याने तडीपार गुंडावर जीवघेणा हल्ला

googlenewsNext

नागपूर : पोलिसांना ‘टीप’ दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तीन आरोपींनी एका तडीपार गुंडावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पॉश वस्तीत झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सम्मेत उर्फ पोंगा संतोष दाभने (२३, सुभाषनगर, संत तुकडोजीनगर) असे तक्रारदाराचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने एका प्रकरणात पोलिसांना टीप दिल्याचा दिनेश संजय तोडसाम (२०, सुभाषनगर) याला संशय होता. त्यावरून त्यांच्यात शनिवारी जोरदार वाद झाला. दिनेश बदला घेण्याची संधी शोधत होता. रविवारी रात्री कुणाल प्रमोद संतापे (१८, सुभाषनगर) व एका अल्पवयीन मुलाला घेऊन तो दुचाकीवर ट्रीपलसीट पोंगाला शोधायला लागला. पोंगा श्रद्धानंदपेठेत मुख्य रस्त्याच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत एका मित्राशी बोलत असल्याचे त्यांना कळाले. तेथे जाऊन त्यांनी पोंगाला गाठले व त्याला मारहाण केली.

दिनेशने पोंगाच्या पोटावर चाकूने वार केला. पोंगाने हाताने वार अडविला असता दिनेशने त्याच्या हातावर वार केले व त्यानंतर मांडीवर चाकू मारत जखमी केले. त्यानंतर तिघेही तेथून पळून गेले. पोंगाला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला व दिनेश तसेच कुणालला अटक करण्यात आली. अल्पवयीन आरोपी अद्यापही फरार आहे.

तडीपार पोंगाविरोधातदेखील गुन्हा

पोंगा हा गुन्हेगारी कारवायांसाठी कुख्यात आहे. त्याला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तरीदेखील तो सर्रासपणे फिरायचा. त्याच्याविरोधातदेखील बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fatal attack on Tadipar goon after giving a 'tip' to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.