कामठी तालुक्यात १९७ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:19+5:302021-01-16T04:13:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील ८५ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात आले असून, सायंकाळी १९७ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील ८५ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात आले असून, सायंकाळी १९७ उमेदवरांचे राजकीय भाग्य मशीनबंद करण्यात आले. या गावांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, दुपारी १.३० वाजेपर्यंत ४७.३४ टक्के तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.८७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
तालुक्यातील काेराडी, पावनगाव, महालगाव, केसाेरी, लाेणखैरी, घाेरपड, भामेवाडा, खेडी व टेमसना या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. या गावांमध्ये एकूण २१,८२३ मतदार असून, यात ११,१४५ पुरुष व १०,६७८ महिला मतदारांचा समावेश आहे. या गावांमध्ये मतदानासाठी एकूण ३६ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली हाेती. सर्व मतदान केंद्रांवर चाेख पाेलीस बंदाेबस्त तैनात केला हाेता.
माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपत्नीक सकाळी ११ वाजताच्या सुमारास काेराडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. महालगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक-१ येथे दुपारी ३०३० वाजताच्या सुमारास मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. कामठी (नवीन)चे ठाणेदार सतीश मेंढे यांच्या नेतृत्वात सर्वच मतदान केंद्रावर पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता.
....
वृद्धांनीही केले मतदान
राजूबाई रामभाऊ झाटे (७५) या वृद्ध महिलेने महालगाव येथील मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर जावून मतदानाचा हक्क बजावला. सलग १० वर्षे सरपंच राहिलेले महालगावचे हरिभाऊ जगताप यांनीही दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मतदान केले. कार्यकर्त्यांचा अभाव असल्याने लहान मुले बुथ सांभाळत असल्याचे चित्र महालगाव येथे बघायला मिळाले. नलिनी दामाेदर कडू (६२) या मनाेरुग्ण महिलेले तिचा मुलगा विक्की याच्यासाेबत घाेरपड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.