जमीन विकण्याच्या नावावर पिता-पुत्राने केली ५१ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 10:57 PM2021-01-06T22:57:23+5:302021-01-06T23:00:04+5:30
Father and son cheated Rs 51 lakh, crime news जमीन विकण्याच्या नावावर एका बिल्डरची ५१ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जमीन विकण्याच्या नावावर एका बिल्डरची ५१ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर भाऊराव ठाकरे आणि त्याचा मुलगा रवी ठाकरे अशी आरोपीची नावे आहेत. दोघेही झिंगाबाई टाकळी येथील जयदुर्गा नगरात राहतात. मानकापूर येथील रहिवासी राजू ज्याेतिप्रसाद मिश्रा बिल्डर आहेत. आरोपींनी मिश्रा व त्यांच्या मित्रासोबत जमीन विक्रीचा सौदा केला होता. काही दिवसानंतर मिश्रा यांना समजले की, आरोपींनी ती जागा अगोदरच दुसऱ्याला विकली आहे. तेव्हा आरोपींनी पहिला सौदा रद्द करण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून पहिल्या खरेदीदाराला द्यावयाची रक्कम बिल्डरनेच दिली. यानंतर ज्ञानेश्वरने जमिनीचा सात-बारा पत्नीच्या नावावर केला. ५१ लाख १५ हजार रुपये घेतल्यानंतरही आरोपींनी जमिनीची रजिस्ट्री करून दिली नाही. त्यामुळे मिश्रा यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.