ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू

By admin | Published: February 25, 2016 03:16 AM2016-02-25T03:16:11+5:302016-02-25T03:16:11+5:30

भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर आॅटोचालकासह एकूण पाचजण जखमी झाले.

Father dies in a truck shock | ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू

Next

मुलासह तीन मुली जखमी : वाडीत आॅटोला अपघात
वाडी : भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर आॅटोचालकासह एकूण पाचजण जखमी झाले. ही घटना वाडी पोलीस ठाण्यांतर्गत एमआयडीसी टर्निंग टी - पॉर्इंटजवळ बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. त्याच्या मुलासह मुली जखमी झाल्या. तर पत्नीला काहीच दुखापत झाली नाही.
झुम जानकी मंडल (४०, रा. काली मंदिरजवळ, मुंगेर शादीपूर, बिहार) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये झुम यांचा मुलगा ओम मंडल, मुली प्रीती, रिया, मधू या चौघांसह आॅटोचालक फिरोज आमिर खान (२८, रा. हसनबाग, सक्करदरा) यांचा समावेश आहे. मंडल कुटुंबीय हे डिफेन्स, अंबाझरीत राहणाऱ्या सुमनकुमार रामस्वरूप मंडल यांच्याकडे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते.
यासाठी ते बर्डीहून एमएच-४९/ई-२४४७ क्रमांकाच्या आॅटोने डिफेन्सकडे निघाले. दरम्यान, अमरावतीकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या ट्रकने एमआयडीसी टी - पॉर्इंट येथे आॅटोला जबर धडक दिली. त्यात झुम मंडल यांचा मृत्यू जागीच झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रकसह तेथून पसार झाला. काही अंतरावर त्याने ट्रक सोडून पळ काढला. तो ट्रक एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन राखुंडे करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Father dies in a truck shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.