वडिलांनी बनविली होती वनबाला, मुलाने बनविली विलीस जीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:26 AM2020-12-11T04:26:15+5:302020-12-11T04:26:15+5:30
लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूृर : दुसऱ्या महायुद्धात सैन्यासाठी हलक्या वजनाचे वाहन म्हणून उपयोगात आणली गेलेली विलीस जीप ...
लोकमत विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूृर : दुसऱ्या महायुद्धात सैन्यासाठी हलक्या वजनाचे वाहन म्हणून उपयोगात आणली गेलेली विलीस जीप आजही वारसाच्या रूपात दिसते. मात्र सदरमधील कराची लाईनमध्ये गोलछा मार्गावर एका बाजूला असलेली मूळ विलीस कार आणि दुसऱ्या बाजुला अगदी हुबेहुब तशीच दिसत असलेली लहान आकाराची विलीस कार सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. शोएब जमील खान या प्रतिभावंत युवकाने ती तयार केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याचे वडील अख्तर जमील खान यांनी १९८९ मध्ये वनबाला ही मिनी रेल्वे तयार केली होती, जी सेमिनरी हिल्समध्ये चालविली जात आहे.
काही वर्षापूर्वी दुबईमधील मरिनमध्ये काम केल्यावर शोएब भारतात परतला. त्यानंतर त्याने वडिलांचा व्यवसाय स्वीकारला. हा त्याच्या आवडीचा उद्योग होता. शोएबने तयार केलेली विलीस जीप फारच मजबूत आहे. ती बॅटरीवर चालते. शोएबने या जीपला अत्यंत देखणे रूप दिले आहे. आपण ही कार स्वत:च्या छंदासाठी तयार केल्याचे तो सांगतो. तरीही वर्धा येथील एका ॲम्युजमेंटने यासंदर्भात रुची दाखविली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शोएबने एक टॉय ट्रेनही तयार केली. ती सध्या बोर धरण येथील पर्यटकांसाठी चालिवली जात आहे.
कोट
आपले संपूर्ण लक्ष रचनात्मकतेवर केंद्रित असते. दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन एका सुविधाजनक वाहनाचे डिझाईन आपण पक्के केले आहे. मात्र त्यासाठी संबंधित एजन्सीची परवानगी आवश्यक आहे. यासाठी खर्चही बराच लागतो. कुणाचे सहकार्य मिळाल्यास उत्तम आणि टिकाऊ वाहन बनविण्याची तयारी आहे. सध्या जीप तयार केली असून, अनेक जण उत्सुकतेने माहिती जाणून घेत आहेत.
- शोएब जमील खान