संपत्तीसाठी केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:24+5:302021-02-25T04:10:24+5:30

नागपूर : घर विकल्यानंतर वडिलांना पैशांची मागणी करून पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांच्या डोक्यावर सब्बल मारून त्यांचा खून केला. ...

Father murdered for wealth | संपत्तीसाठी केला वडिलांचा खून

संपत्तीसाठी केला वडिलांचा खून

googlenewsNext

नागपूर : घर विकल्यानंतर वडिलांना पैशांची मागणी करून पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांच्या डोक्यावर सब्बल मारून त्यांचा खून केला. ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

शेख युसूफ मेहबूब बसीर (७३) रा. मोहम्मद अली चौक असे मृताचे नाव आहे. शेख युनूस शेख युसूफ (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख युसूफ यांना चार मुली व दोन मुले आहेत. आरोपी शेख युनूस हा सर्वांत मोठा मुलगा आहे. सर्व मुले-मुली विवाहित असून ते आपापल्या घरी राहतात. आरोपी हा फॅब्रीकेशनचे काम करतो. तो पूर्वी भुतिया दरवाजा परिसरात पत्नी व दोन मुलांसह किरायाने राहत होता. लॉकडाऊनच्या काळात तो बेरोजगार झाला. त्याची दया आल्याने वडिलांनी त्याला आपल्या घरी बोलावले. चार महिन्यांपासून तो वडिलांसोबत राहत होता. वडील मजुरी करायचे. भालदारपुरा चौकात त्यांचे वडिलोपार्जित घर असून हे घर वडिलांनी १० लाखात विकले होते. त्या घराच्या संपत्तीत आरोपी मुलाला वाटा हवा होता. त्यावरून त्यांच्यात दररोज भांडण सुरू होते. बुधवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरोपीने रागात घरातील सब्बल वडिलांच्या डोक्यावर मारली. यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

-------

Web Title: Father murdered for wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.