प्राणघातक हल्ल्यात वडील, मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:38+5:302021-06-29T04:07:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : शेजाऱ्यांमध्ये असलेल्या घराच्या माेकळ्या जागेचा वाद विकाेपास गेला आणि जागेची माेजणी करण्यात आल्यानंतर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : शेजाऱ्यांमध्ये असलेल्या घराच्या माेकळ्या जागेचा वाद विकाेपास गेला आणि जागेची माेजणी करण्यात आल्यानंतर शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवीत सब्बल व लाेखंडी सळाकींनी वार केले. त्यात वडील व मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद येथे साेमवारी (दि. २८) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
रवींद्र आंबुलकर (५८) व वैभव रवींद्र आंबुलकर (२५) अशी गंभीर जखमी वडील व मुलाचे नाव असून, निरंजन श्रीहरी नगराळे (६८), यशवंत श्रीहरी नगराळे (६०), अनिल लहानू नगराळे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे पाचही जण नांद (ता. भिवापूर) येथील रहिवासी असून, ते शेजारी आहेत. नगराळे यांच्या घराच्या मागे असलेल्या माेकळ्या जागेवर नगराळे व आंबुलकर या दाेघांनीही हक्क सांगितल्याने वादाला ताेंड फुटले.
त्या अनुषंगाने भू-मापन अधिकाऱ्यांनी साेमवारी (दि. २८) दुपाारी या जागेची रीतसर माेजणी करून सीमांकन करून दिले. सीमांकनात बहुतांश जागा रवींद्र आंबुलकर यांच्या वाट्याला आली. सीमांकन आटाेपताच भू-मापन अधिकारी व कर्मचारी निघून गेले. काही वेळात निरंजन, यशवंत व अनिल या तिघांनी रवींद्र व वैभवसाेबत भांडण करीत त्यांच्यावर सब्बल व लाेखंडी सळाकींनी वार केले. यात दाेघांच्याही डाेके व कंबरेला गंभीर दुखापत झाली.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दाेघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि ३२४, ३२६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तिन्ही आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगाेले व उमेश झिंगरे करीत आहेत.