तीन मुलाच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:17 PM2018-11-30T22:17:42+5:302018-11-30T22:18:53+5:30

तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

The father of three sons fled to the minor girl | तीन मुलाच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पळविले

तीन मुलाच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पळविले

Next
ठळक मुद्देकाटोल रेल्वेस्थानकावरील घटना : लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.
मुकेश पुरुषोत्तम भोसले (३५) असे आरोपीचे नाव आहे. अपहरण केलेली विद्यार्थिनी १६ वर्षांची असून ती वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे आई-वडील मजुरी करतात. त्यांना दोन मुले आणि चार मुली आहेत. तीन मुलींचे लग्न झाले. मोठी मुलगी मध्य प्रदेशात राहते. शाळेला सुट्या असल्यामुळे विद्यार्थिनीला मोठ्या बहिणीच्या घरी जायचे होते. त्यामुळे भाऊजी तिला घ्यायला घरी आले. २३ आॅक्टोबरला दोघेही काटोल रेल्वेस्थानकाकडे निघाले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ते काटोल रेल्वेस्थानकावर पोहोचले. गाडीची प्रतीक्षा करीत असताना लघुशंकेला जाते, असे सांगून विद्यार्थिनी गेली. मात्र, परत आली नाही. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. भावजीने तिचा शोध घेतला परंतु ती कुठेच आढळली नाही. याबाबतची माहिती त्यांनी तिच्या कुटुंबीयांना दिली. आई-वडिलांनी काटोल पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मुलीचे अपहरण करण्यात मुकेशचा हात असावा अशी तिच्या आईवडिलांना शंका आहे. दरम्यान मुकेशही घरी आढळला नसल्यामुळे त्यांची खात्री पटली आहे. मुकेशला तीन मुले आहेत. मुलीच्या आईवडिलांनी मुकेशला फोन करून मुलीला कुठे ठेवल्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आईवडिलांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी मुकेशला ठाण्यात हजर राहण्याची तंबी दिली. परंतु मुकेशची अरेरावी कायम असून तो ठाण्यात हजर झाला नाही. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The father of three sons fled to the minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.