आयएएस/आयपीएस होता न आल्याने एफडीए निरीक्षकाने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:31 AM2023-11-29T07:31:42+5:302023-11-29T07:34:34+5:30

Nagpur: आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनात सल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता.  

FDA inspector ends life as IAS/IPS fails | आयएएस/आयपीएस होता न आल्याने एफडीए निरीक्षकाने संपवलं जीवन

आयएएस/आयपीएस होता न आल्याने एफडीए निरीक्षकाने संपवलं जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनात सल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता.  
शुभम कांबळे (२५), असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आले व हॉटेलमध्ये खोली बुक केली. २७ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला, तेव्हा ते बेशुद्धावस्थेत आढळले.

खोलीतच तयार केले विषारी द्रव्य
- हॉटेलच्या लँडलाइनवर शुभमसाठी फोन आल्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने रूमबॉयला कांबळे यांना आवाज देण्यासाठी पाठविले. मात्र, खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. 
-पोलिसांनी तेथे येऊन दार उघडले असता शुभम बेडवर बेशुद्ध पडले होते. खोलीत रसायनांच्या चार ते पाच बाटल्या आढळून आल्या, सुसाइड नोटदेखील सापडली. त्यात आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याने मनात खंत असल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिले होते. 
- चार ते पाच बॉटल्समधील रसायनांचे मिश्रण करून खोलीतच विषारी द्रव तयार केले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

‘नीट’ची तयारी करणाऱ्या मुलाने दिला जीव, काेटातील २८ वी घटना
कोटा : राजस्थानातील कोटा येथे वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची (नीट) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खाेलीत त्याचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी रात्री आढळून आला. कोटातील यावर्षीची ही २८ वी आत्महत्या आहे.
फौरीद हुसेन (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्याचा रहिवासी आहे. येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या हुसेन रात्री आठ वाजेपर्यंत खोलीबाहेर न आल्याने मित्रांनी त्याला आवाज दिला. मात्र, त्याने दरवाजा उघडत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला, तेव्हा तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीत ‘सुसाईड नोट’ सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: FDA inspector ends life as IAS/IPS fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.