नागपूर जिल्हा परिषदेत कोरोना संक्रमणाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:41 PM2020-07-17T20:41:19+5:302020-07-17T20:42:34+5:30

जिल्हा परिषदेत कोरोनाने धडक दिली असून अध्यक्षांच्या पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेत भीतीचे वातावरण असून पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली आहे.

Fear of corona infection in Nagpur Zilla Parishad | नागपूर जिल्हा परिषदेत कोरोना संक्रमणाची धास्ती

नागपूर जिल्हा परिषदेत कोरोना संक्रमणाची धास्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेत कोरोनाने धडक दिली असून अध्यक्षांच्या पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेत भीतीचे वातावरण असून पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली आहे. सुदैवाने जवळपास सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतरही सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून समितीच्या बैठकीकडे सदस्यांनी पाठ फिरविली आहे. गुरुवारी महिला व बाल कल्याण समितीची बैठक होती. सदस्यच न आल्याने बैठक तहकूब करावी लागली. १७ जुलै रोजी शिक्षण समितीच्या बैठकीला सदस्यांनी येण्यास नकार दिल्यामुळे ती सुद्धा बैठक तहकूब करावी लागली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संकट अधिक गडद होत असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेत गर्दी वाढली होती. मात्र अध्यक्षांच्या पतींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. अध्यक्षांच्या पतीच्या संपर्कात येणाºया २९ अधिकारी व कर्मचाºयांची आरटीपीसीआर टेस्ट केली असून २५ अहवाल निगेटिव्ह आले आहे तर चार अहवाल येणे बाकी आहे. तसेच इतर ६० लोकांची एन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्हा परिषदेत कोरोनाने धडक दिल्याची वार्ता पसरताच सदस्यांनीही आपल्याच घरी राहणे पसंत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या बैठका तहकूब कराव्या लागल्या. त्यामुळे येत्या २४ जुलै रोजी होणाºया सर्वसाधारण सभेवरही अन्श्चििततेचे सावट आहे.

अध्यक्षांचे कक्ष बंद
अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने, जिल्हा प्रशासनाने अध्यक्षांचा कक्षच बंद केला आहे. अध्यक्षांची सुद्धा कोरोना टेस्ट झाली असून, त्या निगेटिव्ह निघाल्या आहेत. परंतु नियमानुसार त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मौद्यातील अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह
मौदा नगर पंचायत अंतर्गत कार्यरत असणारी अंगणवाडी सेविका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये दहशत पसरली आहे. शासनाने सेविकांना १ महिन्याचा १००० रुपये प्रोत्साहन भत्ताही दिला आहे. परंतु महिला व बाल कल्याण समितीने कोरोना असेपर्यंत अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला १००० रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, असा ठराव घेतला आहे. शिवाय जी सेविका पॉझिटिव्ह निघाली आहे, तिच्या मानधनात कपात करण्यात येणार नाही, असे महिला व बाल कल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे यांनी सांगितले.

Web Title: Fear of corona infection in Nagpur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.