आदेशाच्या धास्तीत बार वेळेतच बंद हाेतात दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:20+5:302021-01-21T04:08:20+5:30

नागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर बीअर बार, वाइन शॉप, बीअर शॉपी अधिकृतपणे ४ महिने बंद राहिले. सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन ...

In fear of the order, the door closes in time | आदेशाच्या धास्तीत बार वेळेतच बंद हाेतात दार

आदेशाच्या धास्तीत बार वेळेतच बंद हाेतात दार

Next

नागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर बीअर बार, वाइन शॉप, बीअर शॉपी अधिकृतपणे ४ महिने बंद राहिले. सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केले आणि बार, शॉप सुरू करण्यासंदर्भात काही शिथिलता दिली. त्यामुळे आता व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाने आखून दिलेल्या नियमांचा भंग होत असेल तर दंडात्मक कारवाईबरोबरच परवानेसुद्धा रद्द करण्याची तरतूद आहे. याच भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक बार, वाइन शॉप नियम पाळत आहेत.

शासन निर्णयानुसार १.३० वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याला परवानगी आहे. तरीही पूर्वी रात्री १२ ते १२.३० पर्यंत अनेक बार बंद व्हायचे. शहरातील काही ठरावीक बार रात्री उशिरापर्यंतसुद्धा चालायचे. पण, कोरोनानंतर शासनाने या व्यवसायात नियमावली घालून दिली. चार महिन्यांनंतर जेव्हा बार व वाइन शॉप उघडले तेव्हा रात्री ९ च्या आत बंद करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हळूहळू वेळ वाढविण्यात आली. सध्या रात्री १०.३० पर्यंत वाइन शॉप व ११ पर्यंत बीअर बारला परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बीअर बारचा आढावा घेतला असता, ११ वाजेनंतर अनेक बारचे शटर बंद झाल्याचे दिसून आले. धरमपेठ, रेशिमबाग चौक, सक्करदरा चौक, महाराजबाग रोड, वाडी, खापरी या भागांतील बीअर बारमध्ये ११ नंतर कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पूर्वी या भागातील बार रात्री उशिरापर्यंत सुरू असायचे. आता हे बार व्यावसायिक ११ नंतर शटर डाउन करतात. आतमध्ये असलेल्यांनासुद्धा ११ च्या आत बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.

- जिल्ह्यात बार व वाइन शॉपची संख्या

बीअर बार ७११

वाइन शॉप ११७

बीअर शॉपी ८३

- क्षेत्रीय निरीक्षकांतर्फे जिल्ह्यातील बार, वाइन शॉप आणि बीअर शॉपींचे निरीक्षण करण्यात येते. वेळेचे उल्लंघन आणि नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येते. एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात अधिकाऱ्यांतर्फे २५०७ निरीक्षणे केली. त्यात ११८ विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाई दरम्यान दंडही आकारण्यात येतो. गंभीर प्रकरणांमध्ये काही दिवस परवाना रद्द करण्यात येतो.

- प्रमोद सोनोने, नागपूर जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

- परवानाधारकांनाच नियम का?

नियमांचे उल्लंघन केल्यास आम्हाला ५० हजार रुपयांचा दंड आहे. वेळप्रसंगी परवानाही रद्द करता येऊ शकतो. त्यामुळे आम्ही नियमांना डावलून व्यवसाय करणे बंद केले आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसायावर झालेल्या परिणामानंतर सरकारने दिलेली शिथिलता हेच आमचे समाधान आहे. पण, त्याचा दुरुपयोग इतर व्यावसायिक करीत आहेत. शहराच्या बाहेर जाऊन बघाल तर धाबे, बिर्यानी सेंटरमध्ये पहाटे ४ पर्यंत लोकांना बसवून ठेवतात. दारू पिऊ देतात. त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आम्ही दरवर्षी परवाना फी देतो, व्हॅट - टॅक्स भरतो. असे असतानाही परवानाधारकांवरच नियम लादले जातात. आमचा नियमांना विरोध नाही. पण धाबे, बिर्यानी सेंटरवर जर रात्री उशिरापर्यंत असले प्रकार होत असतील तर तेही योग्य नाही, असे नाव न सांगण्याच्या अटीवर बार मालकांनी सांगितले.

Web Title: In fear of the order, the door closes in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.