भरारी पथकावरच अविश्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:13 AM2017-08-15T01:13:00+5:302017-08-15T01:13:32+5:30

परिवहन विभागाचे आपल्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वायू पथकावर विश्वास नसल्याचे दिसून येते.

Fear on the street! | भरारी पथकावरच अविश्वास!

भरारी पथकावरच अविश्वास!

googlenewsNext
ठळक मुद्देओव्हरलोडवर कारवाईसाठी आरटीओ पथकाची अदलाबदल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिवहन विभागाचे आपल्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वायू पथकावर विश्वास नसल्याचे दिसून येते. या विभागाने नुकतेच ओव्हरलोड वाहनांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी वायू पथकाची आरटीओ कार्यालयांतर्गत अदलाबदली करण्याचे निर्देश दिले आहे.
क्षमतेपेक्षा जादा भार (ओव्हरलोड) घेऊन जाणाºया वाहनांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यांनी प्रत्येक आरटीओ कार्यालयाला ओव्हरलोडचे दुप्पट लक्ष्यही दिले आहे. या कारवाईत स्थानिक आरटीओच्या भरारी पथकाकडून वाहतूकदारांना अर्थपूर्ण सवलत मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन, ही अदलाबदल केल्याचे बोलले जात आहे. या पथकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना आकस्मिक भेटी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रत्येक पथकाला दर दिवशी १० जड वाहने तपासण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

Web Title: Fear on the street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.