निर्भयपणे मतदान करा : पोलीस आयुक्त उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 08:32 PM2019-04-10T20:32:09+5:302019-04-11T00:32:52+5:30

कुणाच्याही आमिष अथवा दडपणाला बळी पडू नका. निर्भयपणे मतदान करा. गरज पडल्यास पोलिसांसोबत संपर्क करा, आम्ही तुमच्या तात्काळ मदतीला येऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहे.

Fearlessly cast the vote : Police Commissioner Upadhyay | निर्भयपणे मतदान करा : पोलीस आयुक्त उपाध्याय

निर्भयपणे मतदान करा : पोलीस आयुक्त उपाध्याय

Next
ठळक मुद्देआमिष किंवा दडपणाला बळी पडू नकाअनुचित प्रकाराची माहिती द्या : पोलीस तात्काळ मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाच्याही आमिष अथवा दडपणाला बळी पडू नका. निर्भयपणे मतदान करा. गरज पडल्यास पोलिसांसोबत संपर्क करा, आम्ही तुमच्या तात्काळ मदतीला येऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. शहरात सर्वत्र अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीला कसल्याही अनुचित प्रकाराने गालबोट लागू नये म्हणून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्यात आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच पोलिसांनी शहरातील गुंडांना हाकलून लावण्यासाठी प्रतिबंधक कारवाई, तडिपारी, एमपीडीएसारखी कारवाई केली आहे. अवैध दारू विक्री करणारे आणि धूमधाम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावरही पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांवरही पोलिसांची खास नजर आहे. मात्र, अशाही स्थितीत कुणी मतदारांना आमिष किंवा धाक दाखवून मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतात. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कुणी दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यास कुणालाही न घाबरता पोलीस नियंत्रण कक्षात थेट संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पोलीस तात्काळ तेथे पोहोचून योग्य ती उपाययोजना करेल. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आश्वासनही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दिले आहे.

तात्काळ पोहोचणार क्यूआरटी  


शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल. गुरुवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत सीपी (पोलीस आयुक्त) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Web Title: Fearlessly cast the vote : Police Commissioner Upadhyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.