स्वातंत्र्यदिनाला गर्दी करूनच देशभक्तीची भावना व्यक्त होते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:22+5:302021-08-14T04:13:22+5:30
- प्रशासकीय अधिकारी : शासकीय दिशानिर्देशांचे पालन करून ध्वजारोहणाचे कार्यक्रम करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गर्दी करूनच देशभक्ती ...
- प्रशासकीय अधिकारी : शासकीय दिशानिर्देशांचे पालन करून ध्वजारोहणाचे कार्यक्रम करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्दी करूनच देशभक्ती व्यक्त होते का, असा सवाल उपस्थित करत स्थानिक प्रशासन व विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमणाच्या स्थितीचा धाक दाखवला आहे. शासकीय नियम पाळा, सन्मानाने ध्वजारोहण करा आणि देशभक्तीची भावना व्यक्त करा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संक्रमणाचा प्रकोप बघता लॉकडाऊन व कठोर दिशानिर्देश लागू आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनोत्सवाचे आयोजन सर्वसामान्यांसाठी बंद होते. यंदा मात्र, संक्रमणाचा ज्वर ओसरला आहे आणि व्यापारही रात्री १० वाजतापर्यंत सुरू आहेत. त्यामुळे, यंदा स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष करण्याची इच्छा अनेकांची आहे. परंतु, प्रशासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रोटोकॉलनुसारच हा सोहळा आयोजित करता येणार आहे.
स्वत:च्या सुरक्षेसाठी घ्या काळजी ()
राज्यात काही जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण पसरत आहे. त्यामुळे, भीतीचे वातावरण संपलेले नाही. त्याच कारणात्सव यंदा जल्लोष करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, ध्वजारोहणाची परवानगी आहे. नागरिकांनी हे नियम स्वत:च्या सुरक्षेसाठी पाळावे.
- विमला आर. - जिल्हाधिकारी
कार्यक्रमांना आवरणे गरजेचे ()
संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने, सजगता गरजेची आहे. त्यामुळेच, प्रशासनाने कार्यक्रमांना आवरणे गरजेचे आहे. ध्वजारोहण जरूर करा. मात्र, कार्यक्रमांचे आयोजन नको. गर्दी वाढेल तर धोकाही वाढेल. म्हणून संक्रमणापासून बचाव करणे, ही काळाची गरज आहे.
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल
मोठ्या आयोजनांना परवानगी नाही ()
शासकीय निर्देशानुसार मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नाही. नागरिक या नात्याने स्वातंत्र्योत्सव साजरा होणारच. मात्र, नियमानुसार करावा. शासकीय दिशानिर्देशानुसारच कमाल ५० लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणास परवानगी आहे.
- दयाशंकर तिवारी, महापौर
कोरोना संपलेला नाही ()
कोरोना संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी संक्रमण संपलेले नाही. त्यामुळेच कोरोना संक्रमणापासून बचावासाठी जे नियम लागू केले आहेत, त्याच दिशानिर्देशानुसार जिल्हा १५ ऑगस्टचा सोहळा साजरा केला जाईल.
- रश्मी बर्वे, अध्यक्ष, नागपूर जिल्हा परिषद
..............