रेल्वेत वाटावी सुरक्षितता, विमानतळावर हव्यात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:42+5:302020-12-31T04:08:42+5:30

रेल्वेत सुरक्षेवर भर देण्याची अपेक्षा नागपूरमार्गे दररोज १२५ ते १४० रेल्वेगाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्याही ३५ हजारावर जाते. एवढ्या ...

Feeling safe on the train, needed facilities at the airport | रेल्वेत वाटावी सुरक्षितता, विमानतळावर हव्यात सुविधा

रेल्वेत वाटावी सुरक्षितता, विमानतळावर हव्यात सुविधा

Next

रेल्वेत सुरक्षेवर भर देण्याची अपेक्षा

नागपूरमार्गे दररोज १२५ ते १४० रेल्वेगाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्याही ३५ हजारावर जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरु असताना प्रवाशांची सुरक्षा हा गंभीर प्रश्न आहे. प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वेला ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यासोबतच रेल्वे प्रवाशांसाठी तसेच विभागातील व्यापारी, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा नवीन वर्षात व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे देणार या कामांवर भर

-जुने झालेले रेल्वे रूळ बदलून नवे रूळ टाकणे

-मानवरहित रेल्वेगेट बंद करणे

-थर्ड आणि फोर्थ लाईनच्या कामाला प्राधान्य

-माल वाहतूक वाढवून शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे चालविणे

-प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणे

.......

विमानतळाचा विस्तार आवश्यक

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन सध्या मिहान इंडिया लिमिटेडच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असूनही येथे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. विमानतळावर संपूर्ण विदर्भातून प्रवासी येतात. त्यामुळे त्यासाठी विमातळाचा विस्तार होण्याची गरज आहे. मिहान इंडिया लिमिटेडच्या वतीने नव्या वर्षात निविदा काढून विमानतळाचे खासगीकरण करण्याची अपेक्षा आहे. विमानतळाचे खासगीकरण झाल्यानंतर विमान प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विमानतळावर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहेत. या सोबतच नव्या विमान कंपन्यांचे ऑपरेशनही नव्या वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

विमानतळ प्रशासनाकडून अपेक्षा

-विमानतळ खासगीकरणाची प्रक्रिया मार्गी लागणार

-नव्या वर्षात विमानतळाचा विस्तार होणार

-प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार

-नव्या विमान कंपन्या वाढविणार ऑपरेशन

...............

एसटीने आधुनिक सुविधांची कास धरावी

२०२० मध्ये ८ महिने एसटीची चाके ठप्प होती. एसटीची चाके सुरू झाली. परंतु एसटी बसेस पूर्ण क्षमतेने धावू शकल्या नाहीत. आजही तीच परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न, खासगी वाहतुकीचे आव्हान आणि महामंडळासमोर उभ्या असलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी एसटी महामंडळाला नव्या वर्षात नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी एसटीने प्रवाशांना स्लिपर कोच बसेस, वायफाय, स्वच्छ बसेस आणि आधुनिक सुविधांवर भर देण्याची गरज आहे.

एसटीकडून नववर्षात अपेक्षा

-एसटीने प्रवाशांच्या सुविधेत वाढ करावी

-कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सोडवावा

-विदर्भातील पर्यटनस्थळांसाठी बसेस सुरू व्हाव्या

-बसस्थानकांवर स्वच्छतेसाठी उपाययोजना

-एसटीचे उत्पन्न वाढविण्याठी नवनव्या योजना सुरू कराव्या

-संगणकीकृत पद्धतीने माल वाहतूक सुरू होणार

-प्रत्येक गाडीला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम लावणे

-प्रवासी वाहतुकीसाठी नवे मार्ग शोधणे

-पुणे, नाशिक, हैदराबाद स्लिपर कोच गाड्यांची व्यवस्था

............

Web Title: Feeling safe on the train, needed facilities at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.