खळबळजनक! नागपुरात मेडिकलमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या इंटर्न डॉक्टरवर फायरिंगचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:02 PM2021-11-22T18:02:39+5:302021-11-22T21:37:52+5:30

Nagpur News एकतर्फी प्रेमातून एका संतप्त युवकाने नागपुरातल्या मेडिकल कॉलेजमधील एका महिला इंटर्न डॉक्टरवर गोळी झाडल्याची खळबळजनक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. 

A female intern at a medical center in Nagpur was shot | खळबळजनक! नागपुरात मेडिकलमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या इंटर्न डॉक्टरवर फायरिंगचा प्रयत्न

खळबळजनक! नागपुरात मेडिकलमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या इंटर्न डॉक्टरवर फायरिंगचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देगोळी अडकल्याने अनर्थ टळलाब्रेकअपनंतरच्या वादाची परिणती

नागपूर : ब्रेकअप करणारी मैत्रीण टाळत असल्याने संतप्त झालेल्या तरुणाने तिच्यावर पिस्तूल ताणून ट्रिगर दाबला. मात्र, फायर न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीने पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचा (बीपीएमटी) अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ती मेडिकलमध्ये इंटर्न डॉक्टर म्हणून सेवा देत आहे. तिची आणि सावनेरच्या एका तरुणाची मैत्री होती. चार महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. काही दिवस गप्प बसल्यानंतर तो परत तिला भेटण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याने अनेकदा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्याला टाळत होती.

या पार्श्वभूमीवर, सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक तो मेडिकलमधील अधिष्ठाता कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ई-लायब्ररी समोर आला. तीसुद्धा तेथे आली. काही वेळ गुजगोष्टी केल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वादाला तोंड फुटले. ती आता जवळ येणार नाही, याची कल्पना आल्याने त्याने अनपेक्षितपणे पिस्तूल काढून तिच्यावर रोखले. त्याने ट्रिगर दाबला मात्र फायर न झाल्याने ती बचावली. दरम्यान, प्रसंगावधान राखत तिने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांनी तिच्याकडे धाव घेतली. ते पाहून आरोपी चकोले पळून गेला. या घटनेची वार्ता मेडिकलमध्ये पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती अजनी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार, अजनीचा पोलीस ताफा तसेच पोलीस उपायुक्तांसह अनेक अधिकारी तेथे पोहोचले.

फायरच्या प्रयत्नाने दहशत

मेडिकल परिसरात मारहाण, हाणामारी, बाचाबाचीसह अनेक गुन्हे यापूर्वी घडले आहेत. मात्र, पिस्तुलातून फायर करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला. त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह डॉक्टरांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. या संबंधाने वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती पुढे आली नाही.

Web Title: A female intern at a medical center in Nagpur was shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.