स्त्री शक्ती हीच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचीही प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:23 AM2019-03-09T10:23:22+5:302019-03-09T10:26:25+5:30

स्त्री ही आदिशक्ती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्यांच्या जगनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती ही स्त्री शक्तीच आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले.

Female power is also the inspiration of Brahma, Vishnu and Mahesh | स्त्री शक्ती हीच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचीही प्रेरणा

स्त्री शक्ती हीच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचीही प्रेरणा

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी महिला दिनी केला महिला पत्रकारांचा गौरवस्त्रीने स्वत:शीच स्पर्धा करावी, अकाऊंटंट जनरल शीला जोग यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: स्त्री ही आदिशक्ती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्यांच्या जगनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती ही स्त्री शक्तीच आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून इंडियन ऑडिट अ‍ॅन्ड अकाऊंट सर्व्हिसेसच्या अकाऊंट जनरल (२) शीला जोग उपस्थित होत्या. नागपुरातील महिला पत्रकारांना व पत्रकारांच्या अर्धांगिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्त्री ही आदिशक्ती असल्याचे सांगून पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी, स्त्रीच्या ठायी असलेल्या विविध गुणांना विशद केले. स्त्री ही घर व बाहेरची जबाबदारी लीलया सांभाळू शकते, त्यासाठी तिला तिच्या जोडीदाराची साथ व मार्गदर्शनाची गरज असते असे सांगत, आपल्या आईच्या काही हृद्य आठवणीत सर्वांना सहभागी करून घेतले.
स्त्रीची स्पर्धा ही जगाशी नसते, ती सहकाऱ्यांशीही नसते, तर ती स्वत:शीच असते व तशीच असावी असे मत शीला जोग यांनी व्यक्त केले. तसे केल्याने तिची प्रगती साधत असते, तिला आपल्या वाटचालीत अग्रेसर होता येत असते असे त्या पुढे म्हणाल्या.
या कार्यक्रमात लोकमत समाचारच्या वरिष्ठ उपसंपादक नीता व्यास, लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक रुपाली मुधोळकर, दै. भास्करच्या उपसंपादक दीपा भुर्रे, दै. हितवादच्या नितिशा जैन आणि वरिष्ठ पत्रकार बबन वाळके यांच्या पत्नी रंजना वाळके यांना गौरवान्वित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी करून दिला. संचालन वर्षा बाशू तर आभारप्रदर्शन जोसेफ राव यांनी केले. कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ पत्रकार प्रभृती उपस्थित होते.

Web Title: Female power is also the inspiration of Brahma, Vishnu and Mahesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.