नागपूर महोत्सवात बहारदार कार्यक्रमांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 02:58 AM2016-02-26T02:58:41+5:302016-02-26T02:58:41+5:30

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान यशवंत स्टेडियम येथे नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Festival of extravaganza at the Nagpur Festival | नागपूर महोत्सवात बहारदार कार्यक्रमांची मेजवानी

नागपूर महोत्सवात बहारदार कार्यक्रमांची मेजवानी

Next

नामवंत कलावंतांचे सादरीकरण : २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजन
नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान यशवंत स्टेडियम येथे नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दररोज सायंकाळी ५.३० ते १० या वेळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कलाकार सादरीकरण करणार असल्याने हा महोत्सवात नागपूरकरांसाठी बहारदार कार्यक्रमांची मेजवानी ठरणार आहे. लोकमत समुहाने या महोत्सवाचे संयोजन केले आहे, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली.
या वेळी आमदार अनिल सोेले, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, महोत्सवाचे आयोजक संदीप जोशी, स्थापत्य व विद्युत प्रकल्प समितीचे सभापती सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते. महापौर दटके म्हणाले, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पार पाडण्यासोबतच शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या महोत्स्वाचे आयोजन केले आहे. २८ला सायंकाळी ५.३० ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. तसेच लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, अजय संचेती, अविनाश पांडे, कृपाल तुमाने यांची प्रमुख उपस्थिती राहील. विशेष अतिथी म्हणून आमदार नागो गाणार, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव वल्सा आर नायर सिंह, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया यांच्यासह गटनेते राजू नागूलवार, राजू लोखंडे, राहुल तेलंग, श्रावण खापेकर, किशोर कुमेरिया, गौतम पाटील, असलम खान, हरीश दिकोंडवार,धंतोली झोनच्या सभापती लता यादव उपस्थित राहतील.

Web Title: Festival of extravaganza at the Nagpur Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.