प्रेयसीने रेल्वेसमोर घेतली उडी , तर प्रियकराने विष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:32 PM2018-07-14T22:32:23+5:302018-07-14T22:35:48+5:30
दोन्ही कडच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून लग्न करण्यास मनाई केल्यामुळे निराश झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली तर प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली, तर प्रियकराने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सायंकाळी अवघ्या तासाभराच्या अंतराने घडलेल्या या घटना शनिवारी उघड झाल्या. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन्ही कडच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून लग्न करण्यास मनाई केल्यामुळे निराश झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली तर प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली, तर प्रियकराने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सायंकाळी अवघ्या तासाभराच्या अंतराने घडलेल्या या घटना शनिवारी उघड झाल्या. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला.
राजकुमार दया आगासे (वय २५) आणि काजल काजू मानकर (वय २२) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ते दोघेही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटे टोलीत राहत होते.
राजकुमार आणि काजलचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. एकाच परिसरात राहूनही वेगवेगळे राहावे लागत असल्याने त्यांना विरह सहन होत नव्हता. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना लग्नाचा निर्णय सांगितला. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नालाच नव्हे तर प्रेमालाही विरोध केला. एवढेच नव्हेतर दुसरीकडे त्यांच्या लग्नाच्याही गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे काजल आणि राजकुमार कमालीचे निराश झाले. आपण एकत्र राहू शकत नाही,अशी खात्री पटल्याने काजल शुक्रवारी सायंकाळी जरीपटक्यात गेली. ताजनगर झोपडपट्टीतील रेल्वेलाईनवर तिने रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत तिने आत्महत्या केली. ही वार्ता कळताच राजकुमार कमालीचा अस्वस्थ झाला. त्याने एक दीड तासानंतर अजनीतील श्याम बियर बारजवळ विष प्राशन केले. त्याला मेडिकल रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आधी विरोध, आता आक्रोश
दोघांच्याही लग्नाला जोरदार विरोध करून कुटुंबीयांनी त्यांना लग्न करायचे नाही, असे बजावून सांगितले. या दोघांनी आपापल्या पालकांना ब-याच विणवण्या केल्या. मात्र, दोन्ही कुटुंबातील काही मंडळीचा विरोध कायम होता. आता त्या दोघांनी जीवनयात्रा संपवल्याने दोन्ही कुटुंबीय आक्रोश करीत आहेत.