एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 08:08 PM2023-02-23T20:08:27+5:302023-02-23T20:09:04+5:30
Nagpur News महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे.
नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
वनविकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, विभागीय व्यवस्थापक ए. आर. प्रवीण, नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, एफडीसीएम केवळ एक महामंडळ नसून कुटुंब आहे. वनविकास महामंडळातील खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये यश मिळावावे. क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय काम करायचे असेल तर शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. खेळांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे वनविकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सवदेखील घ्यावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.